शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 4, 2015 00:13 IST

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा चार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे.

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदाचार साखर कारखान्यांचा गोडवा, ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दहा वर्षात ३३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपविली आहे. आत्महत्येला शेतीमालास कमी भाव, गारपीट, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे होत असलेले नुकसान हेच कारण आहे. अशा घटनांमुळे अनेकांच्या हृदयात वेदनेचा काहूर निर्माण झाला आहे. यंदाच्या दुष्काळाला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाटपाण्यामुळे ऊस मळे बहरले आणि माळरानावर डाळिंब, द्राक्ष, लिंबोणीच्या बागा बहरल्या आहेत. त्यामुळे श्रीगोंद्याला कृषी समृद्धी आली आहे. शेती फुलविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांचे हजारो कोटीचे कर्ज काढले आहे, परंतु कधी गारपीट, अतिवृष्टी, पाटपाण्याचे नियोजन नसल्याने पिकांचे नुकसान होते. या नुकसानीस कंटाळून विदर्भ, मराठवाडा परिसरातील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची मालिका सुरू असताना भीमा नदी काठावरील दिलीप अंकुश घोलप (वय ४५) या शेतकऱ्याने बँक व सावकारांच्या कर्जाचा धसका घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. चांगला पाऊस झाला, चांगले पीक आले तर शेतीमालास भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात. परिणामी सावकारांच्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. या दृष्टचक्रात शेतकरी भरडला जातो आणि कर्जाचा बोजा डोईजड झाला की डोक्यात आत्महत्येचा विचार घर करतो अशी परिस्थिती आहे. कर्जबाजारीपणामुळे २००६-०७ या वर्षात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१३-१४ मध्ये तब्बल १६ शेतकऱ्यांनी जीवनाचा शेवट केला. २०१५-१६ या वर्षात दिलीप घोलप या शेतकऱ्याने आत्महत्या करून धक्का दिला आहे. २०१५-१६ या वर्षात पाऊस पाणी नाही. पाटपाणी मिळण्याची परिस्थिती नाही, त्यामुळे वणवा पसरणार आहे. या वणव्यात श्रीगोंद्याची शेती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. श्रीगोंद्यातील बळीराजावर हजारो कोटीचे कर्ज आहे हे या कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न प्रत्येकासमोर उभा आहे. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती निर्माण होणार असल्याने शासनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बँकांच्या कर्जाचे पुनर्गठण करणे गरजेचे आहे. सावकाराच्या कर्जालामुक्ती देण्याची गरज आहे. शिवाय जनावरांसाठी छावण्या आणि हाताला काम देण्याची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र वाढण्याची भीती आहे.