दोन ग्रामपंचायतींसाठी १२ उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST2020-12-25T04:16:55+5:302020-12-25T04:16:55+5:30

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी सुरुवात झाली आहे. परंतु, पहिल्या ...

12 candidates filed applications for two Gram Panchayats | दोन ग्रामपंचायतींसाठी १२ उमेदवारांचे अर्ज दाखल

दोन ग्रामपंचायतींसाठी १२ उमेदवारांचे अर्ज दाखल

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी सुरुवात झाली आहे. परंतु, पहिल्या दिवशी २९ ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. गुरुवारी मात्र, एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी वेळापूर २ पुरुष व १ स्री व जेऊर पाटोदा ६ पुरुष व स्त्री ३ असे एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, देर्डे चांदवड, येसगाव, मढी बुद्रुक, मढी खुर्द, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, मनेगाव, काकडी, जेऊर कुंभारी, धोंडेवाडी, अंजनापुर कोकमठाण, कासली, टाकळी या २७ ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

एकंदरीतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक गेला असला तरी, दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आजपासून सलग तीन दिवस सुटी असल्याने आता थेट सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होऊ शकते, असे अंदाज वर्तविला जात आहे.

Web Title: 12 candidates filed applications for two Gram Panchayats