शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

एकाग्रतेची गुरूकिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 01:13 IST

तुम्ही एखाद्या गोष्टीत खोलवर समरस झालात, तर लक्ष आपोआप केंद्रित होते.

- सद्गुरू जग्गी वासुदेवमी योगक्रियांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धडपडत आहे. त्यात सुधारणा झाली आहे, परंतु सर्व शक्तिनिशी लक्ष केंद्रित करून, समाधीच्या गहन अवस्थेचा अनुभव कसा घ्यावा, याविषयी आपण मला सांगू शकाल का, असा सवाल कुणीतरी मला केला. मी म्हणालो, लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्या तरी गोष्टीत स्वत:ला गुंतवून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या गोष्टीत खोलवर समरस झालात, तर लक्ष आपोआप केंद्रित होते. ज्या ठिकाणी मनापासून सहभाग नसतो, तिथे तुम्ही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलात, तर तो एक छळ होईल; एकाग्रता साधता येणार नाही. उदाहरणार्थ, बहुतांश मुलांना त्यांची पाठ्यपुस्तके म्हणजे एक प्रकारचा छळ वाटतो. त्यात लिहिलेल्या गोष्टी रंगतदार नसतात, म्हणून नाही. कित्येक विलक्षण गोष्टी एका लहानशा पाठ्यपुस्तकात लिहिलेल्या असतात, पण त्या कदाचित निरसतेने लिहिल्या गेल्या असतील. ते ज्या पद्धतीने सादर केले आहे, केवळ त्यामुळे असे घडते. जर तुम्ही मुलांना एखाद्या गोष्टीत गुंतवून ठेवलेत, तर तुम्हाला त्यांचे लक्ष केंद्रित करण्याविषयी काळजी करावी लागणार नाही. ते सदैव एकाग्र राहू शकतील. तुमच्या बाबतीतही हेच लागू पडते. एखाद्या गोष्टीत सहभागी न होता आणि गुंतवून न घेता, तुम्ही जर तुमचे मानसिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलात, तर त्यामुळे केवळ तुमचा छळच होईल, स्वास्थ्य लाभणार नाही. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष द्यायचा प्रयत्न करत आहात, तिथे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यावर तुमचे प्रेम जडायला हवे. हे मी अनेक वेळा सांगितले आहे, पण कदाचित तुमचे तिथे लक्ष नव्हते. तुम्ही केवळ एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडणे आवश्यक आहे. तुम्ही जर तुमच्या बुद्धीला चालना दिलीत, तर तुम्ही इच्छित अशा कोणत्याही गोष्टीच्या प्रेमात पडू शकता, हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर लक्ष केंद्रित करणे आपोआप होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक