शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

Coconut Barfi : बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी नारळाची बर्फी नक्की ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 6:04 PM

Ganesh Festival Special Receipe संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते.

Ganesh Chaturthi 2018 :  संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणरायाला गोडाधोडाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज आम्ही तुम्हाला एका अशा मिठाईची रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही घरच्या घरी सहज तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी नारळाची बर्फी तयार करण्याच्या रेसिपीबाबत. अशी नारळाची बर्फी जी खाताच तोंडात विरघळून जाईल...

साहित्य :

  • खवलेलं खोबरं - 250 ग्रॅम
  • साखर 200 ग्रॅम
  • दूध अर्धा कप
  • तूप 1 चमचा
  • वेलची पूड अर्धा चमचा
  • सुका मेवा (बारिक तुकडे)

 कृती :

- एका बाउलमध्ये दूध घेवून त्यामध्ये साखर विरघळवून घ्या. 

- त्यामध्ये खवलेलं खोबरं टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

- कढई गॅसवर ठेवून थोडी तापू द्या. त्यामध्ये तयार मिश्रण घालून थोडं शिजवून घ्या. 

- मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्या. 

- मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड टाका आणि मिक्स करा.

- मिश्रण नीट एकजीव झाल्यानंतर थोडं घट्ट होऊ लागेल. त्यानंतर गॅस बंद करून कढई गॅसवरून उतरवा.

- एका ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये तूप लावा आणि त्यामध्ये तयार मिश्रण टाका. 

- त्या ताटामध्ये मिश्रण एका लेव्हलमध्ये पसरून घ्या.

- त्यानंतर ते ताट थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.

- बर्फी व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर तिच्या वड्या पाडा.

- एका ताटामध्ये बर्फी घेवून त्यावर सुका मेवा टाकून नैवेद्य दाखवा.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Receipeपाककृती