शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 02:14 IST

‘विचार हेच जीवन आहे.’ सारांशाने विचारांचा उपवास अर्थात नकारात्मक विचारांना मनात थारा न देता, सदैव चांगल्या विचारांचा स्वीकार होय.

- ब्रह्मकुमारी निताप्रत्येक समस्येचे, दु:खाचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. एखादा आजार ठीक करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा आपण वापर करतो, पण आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी कडू औषधे, तसेच रोजच्या रोज काही नियम पाळले जातात. त्याचप्रमाणे, दु:ख, समस्या नष्ट करण्यासाठी आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करण्यासाठी विचारांना सकारात्मक दिशा देणे तितकेच महत्त्वाचे आहे. पूर्ण दिवस कदाचित सकारात्मक राहणे हे खूप मोठे आव्हान असू शकेल, पण दिवसभरात फक्त एक तास आपण नियमितपणे मनाला सकारात्मक विचारांनी भरण्याचा प्रयत्न अवश्य करावा. हा तासाभराचा अभ्यासही मनाला सुखद, तसेच शक्तिशाली बनविण्यास मदत करू शकतो. शरीर कार्यरत ठेवण्यासाठी जसं अन्न ग्रहणाच्या दिवसातल्या तीन ते चार वेळा आपण निश्चित करतो. या अन्नपदार्थांद्वारे शरीराला आवश्यक अशी सर्व जीवनसत्त्वे मिळावी, यावर विशेष लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे, मनाला आवश्यक असणारे पवित्र, शक्तिशाली, तसेच सुविचारांचीसुद्धा वेळ निश्चित करावी, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये यावी. आपल्या विचारांचा शरीरावर खूप मोठा प्रभाव पडतो, हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच मनाची तार ईश्वराशी जोडून विचारांची शुद्धी सतत करत राहणे हे आवश्यक आहे. भक्तिमार्गामध्ये उपवास तोच करू शकतो, ज्याची ईश्वरावर श्रद्धा, तसेच विश्वास आहे. विचारांचा उपवास म्हणजे प्रत्येक विचार स्व-स्मृतीत, तसेच ईश्वरस्मृतीत राहून करणे. थोडक्यात म्हणजे, विचारांद्वारे ईश्वराबरोबर केलेला वास म्हणजेच विचारांचा उपवास. जीवनरूपी गाडीचे विचार हे चालक आहेत. ज्या दिशेने हे विचार जातील, त्या अनुसार आपले जीवन बनेल. या वस्तुस्थितीला समजणे महत्त्वपूर्ण आहे. ‘विचार हेच जीवन आहे.’ सारांशाने विचारांचा उपवास अर्थात नकारात्मक विचारांना मनात थारा न देता, सदैव चांगल्या विचारांचा स्वीकार होय.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक