Satara News: डुलकी लागल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात; दोघे ठार; पाच जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:52 AM2023-01-30T11:52:53+5:302023-01-30T11:54:48+5:30

पुण्यातील सराफ कुटुंबीय

Fatal accident in Khambatki tunnel on Pune-Bangalore National Highway, two killed; Five people were seriously injured | Satara News: डुलकी लागल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात; दोघे ठार; पाच जण जखमी 

Satara News: डुलकी लागल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात; दोघे ठार; पाच जण जखमी 

googlenewsNext

मुराद पटेल

शिरवळ : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील भुईंज हद्दीमध्ये खंबाटकी बोगद्यात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ठार,  पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

रंजना ज्ञानेश्वर सराफ (वय ५२), कांतीकाबाई वाल्मीक जाधव (७०) अशी मृतांची, तर ज्ञानेश्वर विश्वनाथ सराफ (६०), प्रशांत ज्ञानेश्वर सराफ, प्रतीक ज्ञानेश्वर सराफ, नेहा ज्ञानेश्वर सराफ, पूजा शशिकांत जाधव, काशीनाथ रेवनशिधाप्पा वारद अशी जखमींची नावे आहेत.

याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील सराफ कुटुंबीय मोटारीतून (क्र. एमएच १४ डीएफ ६६६६ ) गोकर्ण महाबळेश्वरला गेले होते. सहल संपवून पुण्याला परत जात असताना त्यांच्या गाडीला खंबाटकी बोगद्यात अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यावरील कठड्याला धडकली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. 

जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीही समावेश जखमींना शिरवळच्या जोगळेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे खंबाटकी बोगद्यात वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी भुईंज पोलिसांनी तत्काळ धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Fatal accident in Khambatki tunnel on Pune-Bangalore National Highway, two killed; Five people were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.