पुलावरून पीकअप उलटला, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 10:15 PM2022-09-28T22:15:52+5:302022-09-28T22:17:23+5:30

यदू मोतीराम जाधव (५५) रा. नायगाव असे मृताचे नाव आहे. यदू व इतर त्याचे तीन सहकारी पायदळ प्रातविधीसाठी जात असताना कळंबवरून येत असलेल्या मॅक्स पिकअप वाहनाने धडक दिली. या वाहनामध्ये १४ मजूर बसून होते. ते बुलडाणा येथे कामासाठी जात होते. हे मजूरही अपघातात जखमी झाले. घटनेनंतर जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

Pickup overturns on bridge, one dead | पुलावरून पीकअप उलटला, एकाचा मृत्यू

पुलावरून पीकअप उलटला, एकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चंद्रपूर येथून बुलडाणा जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला अपघात झाला. चालकाला डुलकी आल्याने वाहनावरचे नियंत्रण सुटले. यात रस्त्यावर पायदळ जाणाऱ्या तिघांना धडक बसली. त्यामध्ये एकजण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजता कळंब-बाभूळगाव मार्गावरील नायगाव येथे घडली. 
यदू मोतीराम जाधव (५५) रा. नायगाव असे मृताचे नाव आहे. यदू व इतर त्याचे तीन सहकारी पायदळ प्रातविधीसाठी जात असताना कळंबवरून येत असलेल्या मॅक्स पिकअप वाहनाने धडक दिली. या वाहनामध्ये १४ मजूर बसून होते. ते बुलडाणा येथे कामासाठी जात होते. हे मजूरही अपघातात जखमी झाले. घटनेनंतर जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ममता सुभाष मेश्राम, रमेश सखाराम कांबळे (४५), सुवर्णा विनायक लोणबले (३४), ज्योत्स्ना हेमराज हजरे (३०), ममता सुधाकर मेश्राम (३५), सुषमा दिनेश मेश्राम (३५), शालू गुरुदास जराते (३५), हेमराज मनोहर हजारे (३५), विनायक बापूजी लोणबले (३४), दाकराम केवलराम बोरसे (३६), मोरेश्वर कालिदास गेडाम (३४), जयश्री यादव लोणबले (३०), निराशा हेमंत मडावी (३०) अशी जखमी मजुरांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

रुग्णवाहिका चालक आला मदतीला 
अपघातात जखमी झालेल्या चंद्रपूरच्या मजुरांवर उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिका चालक मनोज लुटे, मदतीला धावून आला. त्याने या जखमी मजुरांच्या भोजनाची व्यवस्था स्वखर्चातून केली. जखमींना चंद्रपूर पोहोचविण्यासाठीसुद्धा वाहनाची तरतूद करण्यात त्याने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेतली. या मदतीमुळे चंद्रपुरातील जखमी मजुरांची गैरसोय टळली.

 

Web Title: Pickup overturns on bridge, one dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात