लाइव न्यूज़
 • 09:07 AM

  यवतमाळ- वरोरा मार्गावरील पाटाळा पुलावरुन टेम्पो वर्धा नदीत कोसळला. दोन जणांचा मृत्यू. मध्यरात्रीची घटना.

 • 09:02 AM

  अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना ससूनमध्ये आणलं, आठ डॉक्टरांचे पथक डीएसकेंची तपासणी करणार, डीएसके स्वत: चालत ससूनमध्ये आल्याची माहिती.

 • 08:56 AM

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा नवी दिल्लीत दाखल, तो आठवडाभर भारतात राहणार आहे,

 • 08:37 AM

  पुणे - सोलापूर हायवेवर उरळी कांचन येथे अपघात. खेडेकर मळा येथे दोन ट्रकची जोरदार धडक. 11 जण जखमी, 4 जणांची प्रकृती गंभीर.

 • 08:18 AM

  कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत सरकारला गप्प बसू देणार नाही,ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचा इशारा.

 • 08:18 AM

  कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या तिस-या स्मृती दिनानिमित्त 'निर्भय बनो' मॉर्निंग वॉक काढण्यात आला.

 • 08:15 AM

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा नवी दिल्लीत दाखल.

 • 08:09 AM

  चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील मूल येथे योगगुरू रामदेवबाबा यांच्या योग चिकित्सा व ध्यान शिबिरात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली योगासने.

 • 07:29 AM

  पुणे - कुलसचिव घेतात स्वतंत्र मानधन, देशातील एकमेव धक्कादायक प्रकार आणखी वाचा...

 • 07:09 AM

  कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

 • 06:55 AM

  औरंगाबाद - रामनगर येथे भरगाव स्विफ्ट झाडाला धडकून अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

 • 11:39 PM

  पिंपरी-चिंचवड : उद्या शहरातील पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार, पिंपरी पवना धरणातील जलविद्युत प्रकल्पामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने महापालिकेचा निर्णय.

 • 10:31 PM

  शारजा : पाचव्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बॉब्वेचा केला पराभव.

 • 10:14 PM

  छत्तीसगड : मुख्यमंत्री रमणसिंह आणि नीरव मोदीचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप करत सभागृहात गदारोळ घालणारे काँग्रेसचे ३० आमदार निलंबित.

 • 09:43 PM

  बिहार : पाटण्याजवळ बस अपघात, सात जणांचा मृत्यू तर 25 हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त.

All post in लाइव न्यूज़