Narendra Modi : "राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 01:12 PM2024-04-25T13:12:34+5:302024-04-25T13:21:12+5:30

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता मोदींनी पलटवार केला आहे. "राहुल गांधी यांना माझा अपमान करण्यात मजा येत आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi on rahul gandhi in madhya pradesh morena | Narendra Modi : "राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार

Narendra Modi : "राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "नरेंद्र मोदी पराभवाच्या भीतीमुळे थरथरत आहेत. म्हणून ते एकापाठोपाठ एक खोटं बोलत आहेत" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. यावर आता मोदींनी पलटवार केला आहे. "राहुल गांधी यांना माझा अपमान करण्यात मजा येत आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील मुरैना येथे जनतेला संबोधित केलं. "मी पाहत आहे की, सोशल मीडिया आणि टीव्हीवर लोक म्हणत आहेत की अशी भाषा पंतप्रधानांसाठी चांगली नाही. देशाच्या पंतप्रधानांसाठी अशी भाषा का वापरली गेली, याचे काहींना दु:ख होतं" असं मोदींनी म्हटलं आहे. 

राहुल गांधींचे नाव न घेता मोदी पुढे म्हणाले की, "ते नामदार आहेत, आम्ही कामदार आहोत हे तुम्हाला माहिती आहे. शतकानुशतके नामदार कामगारांवर अशीच शिवीगाळ करत आहेत. माझी विनंती आहे की या नामदारांना काहीही बोलू नका. आपण सहन करण्यासाठी जन्माला आलो आहोत. आपण सहन करू आणि भारत मातेची सेवाही करू."

"आजकाल काँग्रेसच्या राजघराण्याचे राजपुत्र देशभरात मोठ्याने सांगत आहेत की, आता तुमच्या संपत्तीचा एक्स-रे केला जाईल. आपल्या माता-भगिनींकडे पवित्र स्त्रीधन आहे. काँग्रेस आपली व्होटबँक मजबूत करण्यासाठी ती जप्त करून वाटून घेण्याची जाहीर घोषणा करत आहे" असं ही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Lok Sabha Elections 2024 Narendra Modi on rahul gandhi in madhya pradesh morena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.