जेवणावर ‘मोफत सूप’ हॉटेलचालकाची ऑफर; दुसऱ्या हॉटेलचालकाकडून कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 09:42 AM2023-02-09T09:42:21+5:302023-02-09T09:42:30+5:30

ग्राहक वाढल्याचा राग मनात धरून दुसऱ्या हॉटेलचालकांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण

Hotelier's offer of 'free soup' on meals; Stabbed by another hotelier | जेवणावर ‘मोफत सूप’ हॉटेलचालकाची ऑफर; दुसऱ्या हॉटेलचालकाकडून कोयत्याने वार

जेवणावर ‘मोफत सूप’ हॉटेलचालकाची ऑफर; दुसऱ्या हॉटेलचालकाकडून कोयत्याने वार

googlenewsNext

पुणे : आपल्याकडील ग्राहक वाढविण्यासाठी एका हॉटेलचालकाने जेवणावर ‘मोफत सूप’ देण्याची योजना सुरू केली. त्यामुळे त्याचे ग्राहक वाढल्याचा राग मनात धरून दुसऱ्या हॉटेलचालकांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण केल्याचा प्रकार खडकीत समोर आला आहे.

याप्रकरणी मुलायम रामकृपाल पाल (वय २७, रा. खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे (रा. खडकी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा प्रकार खडकीमधील चौपाटी येथील मेवाड पावभाजी सेंटरसमोर सोमवारी सायंकाळी घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी पाल यांचे ‘ओ शेठ’, तर आरोपींचे ‘साहेब’नावाचे हॉटेल आहे. फिर्यादी यांनी त्यांचे ग्राहक वाढावे, यासाठी जेवणाअगोदर ‘मोफत सूप’ देण्याची योजना चालू केली. त्यामुळे फिर्यादींचे ग्राहक वाढले. त्याचा राग मनात धरून आरोपी चौपाटी येथे आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले. खडकी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Hotelier's offer of 'free soup' on meals; Stabbed by another hotelier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.