PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती

suryakumar yadav and devisha shetty : सूर्यकुमार यादव आणि पत्नी देविशा शेट्टीची अमेरिकेत भटकंती.

भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या संघाचा भाग आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघर्ष करताना दिसलेला सूर्या अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात चमकला. त्याने संथ खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.

सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी अमेरिकेच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे. देविशा शेट्टीने अमेरिकेतील भटकंती शेअर केली आहे.

भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकून सुपर-८ मध्ये प्रवेश केला. दरम्यान, विश्वचषकाच्या रणधुमाळीत सूर्या त्याची पत्नी देविशासोबत न्यूयॉर्क येथे भटकंती करत आहे. सूर्याच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याचे फोटो शेअर केले आहेत.

सूर्या आणि देविशा यांनी अमेरिकेतील खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. त्‍यांच्‍या फोटोमध्‍ये आयस्क्रीम देखील दिसत आहे. सूर्यकुमार यादवने आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

सूर्यकुमार जगातील नंबर वन ट्वेंटी-२० फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवने मागील मोठ्या कालावधीपासून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली.

सूर्या आणि देविशा यांची पहिली भेट २०१२ मध्ये मुंबईच्या पोद्दार डिग्री कॉलेजमध्ये झाली होती. तेव्हा सूर्या B.Com च्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता आणि देवीशा बारावी पास होती. तेव्हा सूर्याचे वय २२ वर्षे तर देविशा १९ वर्षांची होती.

कॉलेजमध्ये असतानाच सूर्याला देविशाचा डान्स खूप आवडला आणि तो तिच्या प्रेमात पडला. तर देविशा देखील सूर्याच्या फलंदाजीच्या शैलीमुळे प्रभावित झाली होती. तेव्हापासून दोघांनी जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले.