दुर्दैव! त्याच्या डोळ्यासमोर बायको, मुलीसह आई-वडिलांचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 06:28 PM2023-02-21T18:28:05+5:302023-02-21T18:30:53+5:30

हा अपघात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात झाला...

Death of his parents along with his wife, daughter before his eyes; Fatal accident in Pune district | दुर्दैव! त्याच्या डोळ्यासमोर बायको, मुलीसह आई-वडिलांचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात भीषण अपघात

दुर्दैव! त्याच्या डोळ्यासमोर बायको, मुलीसह आई-वडिलांचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात भीषण अपघात

googlenewsNext

पुणे : कारेगाव (ता. शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक भीषण अपघात झाला आहे. पुणे - नगर महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून अपघात घडला. यामध्ये एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले आहेत. मृतामध्ये चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघातांत मोटारचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात झाला.

या अपघातात सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) यांचा मृत्यू झाला. तर अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे या अपघातात जखमी झाले आहेत, ते मोटार चालवित होते. त्यांच्यावर कारेगावमधील खासगी रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार होते. यामुळे आश्विन सोबत वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र. एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनर (क्र. एमएच ४३ बीजी २७७६) वर त्यांची मोटार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ब्रह्मा पवार, संतोष औटी, विलास आंबेकर या पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली मोटार बाहेर काढली व स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतू पोलिसांनी क्रेन च्या सहाय्याने मोटार व अपघातग्रस्त कंटेनर हलविल्याने वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Death of his parents along with his wife, daughter before his eyes; Fatal accident in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.