भारतातील 'या' ठिकाणी जाण्यासाठी घ्यावी लागते परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 03:49 PM2018-09-14T15:49:09+5:302018-09-14T16:10:57+5:30

पर्यनासाठी भारत हा उत्तम देश आहे. भारतातील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळं ही नेहमीच विदेशी पर्यटकांना भूरळ पाडत असतात. मात्र भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे जाण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही ठिकाणं कोणती ते जाणून घेऊया.

अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून असल्याने येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते.

हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य, पूर्वेस भूतान, पश्चिमेस नेपाळ तर उत्तरेस चीन देशाचा तिबेट स्वायत्त प्रदेश आहेत. सिक्कीम निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर आहे. सिक्किमला जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते.

मिझोरम हे भारत देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणिपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत. मिझोरममध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत.

लडाख हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. लडाख हा जम्मू आणि काश्मीर या भारतातील राज्याचा एक विभाग आहे. तुमचा येथे फिरण्याचा बेत असेल तर आधी परवानगी घेणे गरजेचे आहे.

नागालँड हे राज्य सृष्टीसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले असून ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य असल्याने येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते.