ही आहेत ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 06:00 PM2018-12-20T18:00:32+5:302018-12-20T18:34:30+5:30

येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस असलेला नाताळाचा सण काही दिवसांवर आला आहे. जगभरात नाताळाची तयारी जोरात सुरू आहे. भारतातही ही दहा ठिकाणे ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी उत्तम आहेत.

दमण - वर्षभर शांत असणारा दमण दिवचा परिसर नाताळाच्या काळात गजबजून जातो. येथील पोर्तुगिज डान्स पर्यटकांना आकर्षित करतो. तसेच दमणमधील चर्च ऑफ बोम जिझस प्रेक्षणीय आहे.

गोवा - नाताळाचा सण पाहावा तर गोव्यामध्ये. गोव्यातील बीच, पार्टी आणि ख्रिसमसचे सेलिब्रेशन प्रसिद्ध आहे.

गुजरात - गुजरातमध्येही ख्रिसमसदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात. विशेषत: येथील दीव-दमणच्या किनाऱ्यांवर होणाऱ्या पार्ट्यांची रंगत काही औरच असते.

केरळ - केरळमध्ये अनेक प्राचीन चर्च असून, येथे साजरा होणारा नाताळाचा सण प्रेक्षणीय असतो.

कोची - कमी खर्चात ख्रिसमसचा आनंद घ्यायचा असेल तर कोची हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. येथील रोषणाई आणि लोकगीत तुमच्या ख्रिसमस पार्टीला अविस्मरणीय बनवतात.

कोलकाता - ख्रिसमसदरम्यान कोलकातामध्ये विशिष्ट्य गेम्स, स्वादिष्ट भोजन, लष्करी बँड प्रदर्शन आणि नाटकांचे आयोजन केले जाते. तसेच नाताळावेळी पार्क स्ट्रीट, सेंट पॉल चर्च येथे करण्यात येणारी रोषणाई प्रेक्षणीय असते.

मुंबई - बहुसांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या मुंबईमध्येही नाताळ उत्साहात साजरा होतो. इथे रात्रीच्या वेळी तुम्ही ख्रिसमस पार्टीचा आनंद घेऊ शकता.

पाँडिचेरी - पाँडिचेरी येथील सुंदर समुद्र किनारे ख्रिसमस पार्टींसाठी उत्तम पर्याय आहेत. येथे तुम्ही ख्रिसमस आणि नववर्षाचे चांगल्या प्रकारे सेलिब्रेशन करू शकता.

शिलाँग - हिल स्टेशनवर ख्रिसमस सेलिब्रेट करायचा असेल तर शिलाँग हा उत्तम पर्याय आहे. येथे ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

शिमला - येथील गुलाबी थंडी आणि बर्फाच्छादित पर्वत रांगांमध्ये ख्रिसमस सेलिब्रेट करायची मजा काही औरच आहे. येथील जुन्या कॅथेड्रल चर्चमध्ये तुम्ही ख्रिसमसचा आनंद घेऊ शकता.