फ्री वाय-फायचा वापर करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 05:54 PM2019-02-02T17:54:59+5:302019-02-02T18:09:25+5:30

स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा देण्यात येते. वाय-फायची गरज असल्यास कोणताही विचार न करता अनेकदा स्मार्टफोन कनेक्ट केला जातो. मात्र अशाप्रकारे फ्री वाय-फायचा वापर करणं महागात पडू शकतं. मोफत वाय-फायचा वापर केल्यामुळे महत्त्वाची माहिती चोरीला जाण्याची शक्यता अधिक असते.

फ्री वाय-फायचा वापर केल्यास डिजिटल व्हायरस सहजपणे आपल्या स्मार्टफोनमध्ये येण्याचा धोका असतो. हे व्हायरस स्मार्टफोन अथवा अन्य उपकरणं स्लो करतात. त्यामुळे शक्यतो फ्री वाय-फायचा वापर टाळा.

मोफत वाय-फायवरून शॉपिंग करण अनेकदा महागात पडू शकतं. ऑनलाईन शॉपिंग करताना अनेकदा पैशाचे व्यवहार असतात तेव्हा बँकेच्या अकाऊंटची माहिती दिली जाते. मात्र हॅकर अशाप्रकारे आपली माहिती चोरून चुकीचे व्यवहार करू शकतात.

हॅकर्स अनेकदा फेक नावाने वाय-फाय नेटवर्क तयार करतात. Free Network किंवा No Password अशापद्धतीने ते युजर्सना आकर्षित करतात. युजर्स मोफत वाय-फाय असल्याने आपला स्मार्टफोन कनेक्ट करतात. मात्र अशापद्धतीने कनेक्ट केल्यास डेटा चोरीला जाण्याची शक्यता अधिक असते.

स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या सुरक्षिततेची नेहमी काळजी घ्या. फोन आणि लॅपटॉपमध्ये लेटेस्ट ऑपरेटींग सिस्टम आणि अ‍ॅन्टी व्हायरस ठेवा. यामुळे महत्त्वाची माहिती सुरक्षित राहण्यास मदत होईल.

महत्त्वाचं काम असल्यामुळे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोफत वाय-फायचा वापर करणं गरजेच असतं. मात्र अशा वेळी सर्वप्रथम प्रोव्हायडरची ऑथेंटिसिटी चेक करूनच त्याचा वापर करा.