फोनमध्ये 4G इंटरनेट स्पीड होणार चौपट; 'या' टिप्स करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 04:24 PM2019-04-10T16:24:27+5:302019-04-10T16:31:16+5:30

स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून तो प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. आता सर्वच स्मार्टफोन हे 4G सपोर्टसह येतात. तसेच फोनमध्ये 4G VoLTE देण्यात आलेले असते. मात्र अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे इंटरनेटचा नीट वापर करता येत नाही. त्यामुळे फोनमध्ये 4G इंटरनेट स्पीड कसा वाढवायचा हे जाणून घेऊया.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा स्पीड स्लो असेल तर सर्वप्रथम फोनच्या सेटींगमध्ये जा.

फोनच्या सेटींगमध्ये गेल्यावर नेटवर्क सेटींगचा एक पर्याय मिळेल. त्यामध्ये गेल्यावर preferred type of network हे 4G किंवा LTE को सिलेक्ट करा.

याशिवाय नेटवर्क सेटींगमध्ये जाऊन Access Point Network (APN) ची सेटिंग चेक करा. त्यामध्ये कोणतं APN सिलेक्ट केलं आहे हे चेक करा. स्पीडसाठी योग्य APN असणं गरजेचं आहे. जर योग्य APN निवडला नसेल तर APN ऑप्शनवर जाऊन सेटींग करा.

स्मार्टफोनमध्ये असलेले सोशल मीडिया फोनच्या इंटरनेटचा स्पीड कमी करतं. तसेच यामुळे जास्तीचा डेटाही खर्च होतो. यापासून वाचण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन ऑटो प्ले व्हिडीओ बंद करा. तसेच फोनचं ब्राऊजर डेटा सेव्ह मोडमध्ये सेट करा.