जबरदस्त! Nokia करणार कमबॅक, जमिनीवर आपटल्यानंतरही खराब होणार नाही 'हा' 5G फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 02:08 PM2023-04-27T14:08:34+5:302023-04-27T14:35:11+5:30

HMD ग्लोबल नोकिया XR20 सारख्या मजबूत स्मार्टफोनवर काम करत आहे, याची घोषणा जुलै 2021 मध्ये झाली होती. एका अहवालानुसार, या फोनला आधी Nokia Sentry 5G असे संबोधले जात होते.

HMD ग्लोबल नोकिया XR20 सारख्या मजबूत स्मार्टफोनवर काम करत आहे, याची घोषणा जुलै 2021 मध्ये झाली होती. एका अहवालानुसार, या फोनला आधी Nokia Sentry 5G असे संबोधले जात होते.

सुरुवातीच्या काळात मोबाईल कंपनीतील अग्रगण्य असलेली कंपनी Nokia. आता नोकियाने पुन्हा एकदा मार्केटमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे.

Nokia फोन त्यांच्या मजबूतपणासाठी ओळखले जातात. एक काळ असा होता की नोकियाचे मोबाईल मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. आता एक नवीन स्मार्टफोन येत आहे, जो खूप मजबूत असेल.

HMD ग्लोबल नोकिया XR20 सारख्या मजबूत स्मार्टफोनवर काम करत आहे, ज्याची घोषणा जुलै 2021 मध्ये झाली होती. एका अहवालानुसार, या फोनला आधी Nokia Sentry 5G असे संबोधले जात होते आणि तो एक नवीन स्मार्टफोन म्हणून बाजारात येऊ शकतो.हा XR सीरीजचा असू शकतो आणि त्याचे नाव Nokia XR30 आहे.

गेल्या वर्षी, HMD Global ने Nokia Sentry 5G स्मार्टफोन येणार असं बोलले जात होते. याचा एक व्हिडिओ YouTube वर लीक झाला होता.

या लीकमुळे काही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन समोर आले. नोकियाच्या या मोबाईलमध्ये दोन कॅमेरा सेन्सर आणि मागील बाजूस एक फ्लॅश असेल.

तसेच, स्मार्टफोनमध्ये "Zeiss" ब्रँडिंगच्या जागी "XR" अक्षरे असल्याचे दिसते. जर्मन कॅमेरा ब्रँडसोबतची भागीदारी आहे. मोबाईलमध्ये चंकी बेझल्ससह पंच होल डिस्प्ले असेल. मोबाईलची रचना आधीच्या मॉडेल्ससारखीच आहे.

Nokia XR30 मध्ये 6GB RAM, 128GB अंतर्गत स्टोरेज आणि 33W चार्जिंगसह 4,600mAh बॅटरी असेल. त्याच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा असेल.

सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. त्याची किंमत सुमारे 40 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.