तब्बल दोन लाखांचा 'हा' स्मार्टफोन लाँच, फिचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 01:29 PM2019-02-25T13:29:43+5:302019-02-25T14:08:56+5:30

Huawei ने बहुप्रतीक्षित Huawei Mate X हा आपला 5G फोल्डेबल स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लाँच केला आहे. तब्बल दोन लाखांहून अधिक किंमत असलेल्या Huawei Mate X या स्मार्टफोनची खासियत जाणून घेऊया.

Huawei Mate X ओपन केल्यानंतर यामध्ये 8 इंचाचा रॅपअराउंड OLED टॅबलेट डिस्प्ले दिसतो. तर हा स्मार्टफोन बंद केल्यानंतर 6.6 इंच स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनमध्ये बदलतो. फोल्ड केल्यानंतर या स्मार्टफोनमध्ये 2480x1148 पिक्सलसोबत 6.6 इंचाचा मेन डिस्प्ले दिसतो.

अनफोल्ड कंडीशनमध्ये या स्मार्टफोनमध्ये 2480x2200 पिक्सलसोबत 8 इंचाचा मेन डिस्प्ले दिसणार आहे. तर फोल्ड केल्यानंतर Huawei Mate X चा रियर डिस्प्ले 6.4 इंचाचा होतो.

हुवावे मेट एक्समध्ये 55 वॅटच्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची बॅटरी केवळ अर्ध्या तासात 85 टक्के चार्ज होते असा दावा कंपनीने केला आहे.

Huawei चा 5G फोल्डेबल स्मार्टफोन Huawei Mate X हा Kirin 980 प्रोसेसरसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनसाठी वापरण्यात आलेला प्रोसेसर स्मार्टफोनचा परफॉर्मन्स अधिक स्मूथ करण्याचा प्रयत्न करतो.

5G स्पीडसाठी हुवावे मेट एक्समध्ये बलॉन्ग 5000 5G मॉडेम देण्यात आले आहे. 5G नेटवर्क मिळाल्यावर हा स्मार्टफोन फक्त 3 सेकंदात 1जीबीचा कन्टेंट सहज डाउनलोड करू शकतो.

Huawei Mate X या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेऱ्याबाबत अधिक माहिती अद्याप कंपनीच्या वतीने देण्यात आलेली नाही. या स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही. फोनमध्ये रियर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Huawei Mate X या स्मार्टफोनमध्ये 8जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

हुवावे मेट एक्सची किंमत तब्बल 2,299 यूरो म्हणजेच जवळपास 2,09,400 रुपये आहे. यावर्षी जूनमध्ये Huawei Mate X या स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.