तुमचे पॅन कार्ड बनावट नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 01:29 PM2022-01-05T13:29:56+5:302022-01-05T13:37:51+5:30

How to Identify Fake PAN Card: परमनन्ट अकॉउंट नंबर अर्थात पॅन हे आता आवश्यक दस्तऐवज झाले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यापर्यंत सर्वच टप्प्यात पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. त्यामुळे पॅन कार्ड प्रत्येकाकडे असायलाच हवे. मात्र, त्यात बनावट कोणते आणि अस्सल कोणते, याची ओळख करता यायला हवी.

बनावट पॅन आणि आधार कार्ड तयार करून देणाऱ्यांची संख्या देशात अधिक आहे. अनेकदा बनावट पॅन व आधार कार्ड तयार करून देणाऱ्या टोळ्यांचे रॅकेटही उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्यात पॅन क्यूआर कोडचा देखील समावेश आहे.

इन्कम टॅक्स विभागाने पॅन कार्डला क्युआर कोड जोडला आहे. क्युआर कोडवरून पॅन कार्ड खरे की खोटे हे लगेच ओळखता येते.

स्मार्ट फोनमध्ये क्युआर कोड स्कॅन करून ही पडताळणी करता येते. मात्र, त्यासाठी मोबाईलमध्ये इन्कम टॅक्स विभागाचे ॲप डाऊनलोड करावे लागते.

इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलवर जा.व्हेरिफाय युवर पॅन या पर्यायावर क्लिक करा.त्यामुळे एक नवीन पेज सुरू होईल. त्यावर मोबाईल नंबर, जन्मतारीख व कार्ड नंबर नोंदवा.

तुमचा डेटा जुळतो किंवा कसे याची विचारणा करणारा एक मेसेज मोबाईलवर येईल. त्यावरून पॅन कार्ड खरे आहे की खोटे, हे समजेल. कार्ड बनावट असल्यास इन्कम टॅक्स विभागाकडे तक्रार नोंदवता येते.