एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं

कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी प्ले ऑफच्या जागा पक्क्या केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 07:49 PM2024-05-18T19:49:25+5:302024-05-18T19:50:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Virat Kohli becomes 2nd batter to complete 700 fours in IPL,RAIN STOPPED PLAY AT CHINNASWAMY STADIUM | एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं

एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी प्ले ऑफच्या जागा पक्क्या केल्या आहेत. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला विजेता प्ले ऑफचे तिकीट पक्कं करणार आहे. CSK ला फक्त विजय पुरेसा आहे, तर RCB ला विजयासह नेट रन रेटचं गणितही सोडवावं लागणार आहे.  CSK १४ गुणांसह सध्यातरी चौथ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांचा नेट रन रेट हा ०.५२८ असा आहे. RCB हे १२ गुणांसह अजूनही शर्यतीत आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट हा ०.३८७ असा आहे. त्यामुळे आज एक तर त्यांना १८ पेक्षा जास्त धावांनी किंवा १८.१ षटकांत विजय मिळवावा लागणार आहे. 

१८ मे अन् RCB ची अपराजित मालिका
- विजयी वि. CSK, २०१३
- विजयी वि. CSK, २०१४
- विजयी वि. KXIP, २०१६ 
- विजयी वि. SRH, २०२३  
 


चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीला यावे लागेल आणि विजयासह नेट रन रेटचं गणित गाठण्यासाठी मोठी झेप घ्यावी लागेल. मोईन अलीच्या जागी आज CSK च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिचेल सँटनर आला आहे, तर RCB ने कोणताच बदल केलेला नाही. या सामन्यात खेळून दिनेशे कार्तिक हा ४०० ट्वेंटी-२० सामना खेळणारा दुसरा ( रोहित शर्मा - ४४०) भारतीय ठरला. तुषार देशपांडेने पहिल्या षटकात केवळ दोन धावा दिल्या, परंतु शार्दूल ठाकूरच्या षटकात विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी १६ धावा चोपल्या. विराटने तिसऱ्या षटकात तुषारचे षटकाराने स्वागत करून इरादा स्पष्ट केला.

Image
विराटने आयपीएलमध्ये ७०० चौकार पूर्ण केले आणि शिखर धवननंतर ( ७६८) असा पराक्रम करणारा तो दुसरा फलंदाज आहे. ३ षटकांत ३१ धावा चोपल्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि मॅच थांबली. विराट ९ चेंडूंत १९ आणि फॅफ ९ चेंडूंत १२ धावांवर खेळतोय... विराटने बंगळुरुच्या स्टेडियमवर सर्वाधिक ३००५ धावांचा टप्पा ओलांडला आणि एका मैदानावर सर्वाधिक आयपीएल धावा करणारा फलंदाज बनला.  त्याने रोहित शर्माचा वानखेडेवरील ( २२९५) धावांचा विक्रम मोडला.  

 

Web Title: IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Virat Kohli becomes 2nd batter to complete 700 fours in IPL,RAIN STOPPED PLAY AT CHINNASWAMY STADIUM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.