Gmail वर भलत्याच व्यक्तीला गेलेला ई-मेल असा घ्या परत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:24 PM2019-06-03T14:24:05+5:302019-06-03T14:27:47+5:30

फेसबुक अथवा WhatsApp वर एखादा मेसेज चुकून सेंड केला तर तो डिलीट करण्याची सोय असते. मात्र जीमेलवर चुकून पाठवलेला ईमेल डिलीट कसा करायचा हे अनेकांना माहीत नाही. Gmail वर देखील ही सोय देण्यात आली आहे. पाठवलेला मेल कसा परत घ्यायचा हे जाणून घेऊया.

सर्वप्रथम स्मार्टफोन किंवा संगणकावर आपलं जीमेल अकाऊंट ओपन करा.

लॉग इन केल्यानंतर अकाऊंटच्या वर उजव्या बाजूला कॉर्नरमध्ये आपल्या प्रोफाईल फोटो खाली काही मेन्यू देण्यात आलेले दिसतील. त्या मेन्यूवर क्लिक करून सेटींग ऑप्शनमध्ये जा.

‘Undo Send’ चा एक पर्याय दिसेल. त्याच्यासमोर असलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करून ‘Undo Send’ फीचर अनेबल करा.

‘Undo Send’ हे फीचरच्या खाली ‘Send cancellation period’ नावाचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून Send cancellation period मध्ये टाईम (5-30) सेकंदामध्ये सिलेक्ट करा.

सेटींगमध्ये बदल केल्यानंतर खाली ते सेव्ह करा.

त्यानंतर तुमच्या जीमेलमध्ये ‘Undo Send’ फीचर अनेबल होईल.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जेव्हा ईमेल पाठवला जाईल तेव्हा तो काही सेकंदासाठी सेव्ह होतो. तसेच स्क्रिनवर मेल पाठवल्यानंतर तो ईमेल Undo करण्यासाठी एक मेसेज दिसेल.