उत्तर प्रदेशात NTPC प्रकल्पात भीषण स्फोट, 26 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 10:15 PM2017-11-02T22:15:01+5:302017-11-03T10:31:10+5:30

उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात बुधवारी (1 नोव्हेंबर ) बॉयलरचा स्फोट झाला.

दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 100 कामगार गंभीररित्या जखमी झालेत

500 मॅगावॅटच्या वीज निर्मिती केंद्रात ही दुर्घटना घडली

घटनेनंतर खबरदारी म्हणून एनटीपीसी प्रकल्पाच्या हद्दीत लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली होती

अभिनेत्री व राज्यसभा सदस्य रेखा यांनी त्यांच्या खासदार निधीतून रायबरेलीसाठी २.५ कोटी रुपयांची मदत केली आहे