बापरे! 200 कोटींचं हायप्रोफाईल लग्न, पाहुण्यांसाठी 200 हेलिकॉप्टर केले बूक; कोणाचं आहे हे लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 11:12 AM2019-06-10T11:12:45+5:302019-06-10T11:16:22+5:30

दक्षिण आफ्रिकेतील एनआरआय भारतीय उद्योजकाच्या मुलांची हाय-प्रोफाईल लग्न भारतातील उत्तराखंड येथील शानदार हिल स्टेशनजवळ होणार आहे. या लग्नासाठी जवळपास 200 कोटी रुपये खर्च येणार आहे.

अजय गुप्ता यांचा मुलगा सूर्यकांत याचे लग्न 18-20 जून दरम्यान होईल तर त्यांच्या छोटे बंधू अतुल गुप्ता यांचा मुलगा शशांकचं लग्न 20-22 जून दरम्यान होणार आहे. सूर्यकांत याचे लग्न हिरा व्यापाऱ्याच्या मुलीशी तर शशांकचे लग्न दुबईतील उद्योजकाच्या मुलीशी होणार आहे.

उत्तराखंडमधील हिल स्टेशन औली येथे गुप्ता कुटुंबीयातील मुलांची लग्न होणार आहे. या लग्नासाठी औली परिसरातील सर्व हॉटेल्स, रिसोर्ट आठवडाभरासाठी बुक करण्यात आली आहेत. लग्नाच्या सजावटीसाठी लागणारी फुलं स्विर्झंलंडमधून 5 कोटी रुपयांना मागविण्यात आली आहेत.

तसेच दिल्लीहून पाहुण्यांना औली येथे आणण्यासाठी जवळपास 200 हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आली आहेत. या रॉयल लग्नासाठी 100 पंडितांचे बुकींग करण्यात आलं आहे. लग्नाची आमंत्रण पत्रिकाही चांदीपासून बनविण्यात आली असून त्याचं वजन साडेचार किलो आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील अजय गुप्ता, अतुल गुप्ता, राजेश गुप्ता यांनी दक्षिण आफ्रिकेत उद्योगाचा साम्राज्य उभं केलं आहे. 1993 च्या आधी गुप्ता कुटुंबीय सहारनपूर येथील रायवाला मार्केटमध्ये रेशनचं दुकान चालवत असे.

टॅग्स :लग्नmarriage