आमदार अपात्रता प्रकरण, राम मंदिर, लोकसभा निवडणूक..; २०२३ सरले २०२४ मध्ये काय असेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 06:43 PM2023-12-31T18:43:31+5:302023-12-31T18:54:07+5:30

2024 मध्ये राज्य आणि देश पातळीवर अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

६ जानेवारीला आदित्य-एल१ लॅग्रेंज पॉइंटरवर पोहोचणार आहे. त्याशिवाय नव्या वर्षांत गगनयान-१, मंगळयान-२, शुक्रयान-१ चे प्रक्षेपण होणार आहे.

आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १० जानेवारीपर्यंत निकाल देणार आहे.

राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेला १४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

जगातील सर्वात मोठा टेक्सटाइल फेस्टिव्हल फेब्रुवारीत दिल्लीत पार पडणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील भरवीर ते इगतपुरी मार्ग सुरू होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसह, आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे.

भारताशिवाय अमेरिका, रशिया, इंग्लंड, पाकिस्तानसह ७० देशांमध्ये मतदान होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातही ऑलिम्पिक स्पर्धेसह, टी-२० वर्ल्डकप, युरो कप स्पर्धांचे आयोजन केले आहे.

जगातील सर्वात उंच रेल्वेपूल असलेल्या चिनाब पुलाचे नव्या वर्षांत उद्घाटन होणार आहे.

मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रो-३ प्रकल्प, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड कार्यान्वित होणार आहे.

वाहन उद्योगात इलेक्ट्रिक श्रेणीतील अनेक नवी वाहने बाजारात येणार आहे.