राहुल गांधींचा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 07:06 PM2017-12-04T19:06:12+5:302017-12-04T19:09:53+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला.

यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

राहुल यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.