प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 05:34 PM2018-01-25T17:34:49+5:302018-01-25T17:43:59+5:30

26 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि लोकशाही अस्तित्वात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लागला दोन वर्षं 11 महिन्यांचा कालावधी

राज्यघटनेची पहिली प्रत छापलेली नव्हती, तर हाताने लिहिलेली होती.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची परंपरा 1955 पासून सुरू झाली.

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा तीन दिवस - 29 जानेवारीपर्यंत चालतो.

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या व्यक्तींना गौरवलं जातं.

संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये देखील दिली आहेत. स्वातंत्र्य, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि शिक्षण हक्क, घटनेतील उपाय हे आपले ६ मूलभूत अधिकार आहेत

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.

संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.