नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 08:56 AM2017-09-30T08:56:46+5:302017-09-30T11:11:13+5:30

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा आयोजित करण्यात आला (फोटो - संजय लचुरिया)

२७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. दस-याला म्हणजेच विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला स्थापनादिवस साजरा करतो.

विजायदशमी उत्सवासाठी सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह भैय्याजी जोशी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते (फोटो - संजय लचुरिया)

सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी यावेळी शस्त्रपूजन करण्यात आलं. (फोटो - संजय लचुरिया)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी यावेळी शारिरीक प्रात्यक्षिके सादर केली

सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी स्वयंसेवकांना संबोधित केलं. (फोटो - संजय लचुरिया)