महिला दिनविशेष

By admin | Published: March 8, 2016 12:00 AM2016-03-08T00:00:00+5:302016-03-08T00:00:00+5:30

महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक प्रतिक्षा नगरमधील ओपन जिममध्ये व्यायाम करुन आपला महिला दिन साजरा करत आहेत. (छाया - सुशील कदम)

दरवर्षी ८ जून हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. काहीजण आपली कर्तव्य बजावून हा दिन साजरा करतात तर काही जण आपल्या आरोग्याची काळजी घेणं पसंत करतात. (छाया - सुशील कदम)

ईस्टर्न फ्रीवेवर महिलांसाठी शौचालय बांधण्यात यावी यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांनींनी आंदोलन केले. (छाया - सुशील कदम)

एकीकडे महिला दिन साजरा होत असताना महिलांचा शौचालयाचा महत्वाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. (छाया - सुशील कदम)

राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थही हा दिवस साजरा केला जातो. माटुंगा पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचा-यांनी आपली जबाबदारी सांभाळत महिला दिन साजरा केला. (छाया - सुशील कदम)

जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील महिलांचे कौतुक करत आणि त्यांच्याप्रती सन्मान व प्रेम व्यक्त केले जाते. (छाया - सुशील कदम)

बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. (छाया - दत्ता खेडेकर)

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा

महिला दिनामुळे स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. (छाया - दत्ता खेडेकर)

१९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष

विले पार्ले रेल्वे स्थानकावर महिला दिनानिमित्त फुलांची सजावट करुन शुभेच्छा देण्यात आल्या. (छाया - दत्ता खेडेकर)

आता बँका कार्यालये शाळा कॉलेजेस एवढेच नव्हे तर सोशल मीडियावरमधूनही महिला दिन जोरदार साजरा होतो. (छाया - विशाल हळदे)

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने करत कामाच्या ठिकाणी सुधारणा करण्याची मागणी केली होती. (छाया - विशाल हळदे)

१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. (छाया - विशाल हळदे)

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. (छाया - विशाल हळदे)

जागतिक महिला दिनानिमित्त भाऊ प्रतिष्ठान व डॉ राजेश मढवी यांच्या वतीने ठाण्यातील विष्णूनगरनौपाडा येथील गोखले मंगल कार्यालय येथे खास महिलांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनार्दन खरिवले सचिन पाटील संजय परब आदिंसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (छाया - विशाल हळदे)

जागतिक महिला दिनानिमित्त मथन हॉल येथे विविध क्षेत्रात काम करणा-या सामाजिक संस्था पोलीस शिपाई व महिलांचा विशेष कार्य केल्याबद्दल कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ रश्मी करंदीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (छाया - विशाल हळदे)

ठाणे एसटी स्थानकात जागतिक महिला दिनानिमित्त एसटीच्या वाहक महिलांनी प्रवाशी महिलांना फुलं देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. (छाया - विशाल हळदे)

ठाणे एसटी स्थानकातदेखील महिला दिन साजरा करण्यात आला. (छाया - विशाल हळदे)

साताऱ्यात रंगलेला मुलींचा कबड्डीचा सामना. (छायाचित्रकार - जावेद खान)