सागरिका-जहीर यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 11:52 PM2017-12-01T23:52:52+5:302017-12-01T23:58:27+5:30

झहीर खान व अभिनेत्री सागरिका घाटगे या नवदाम्पत्याने शुक्रवारी सायंकाळी येथील करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले.

त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती.

झहीर खान व सागरिका घाटगे यांचा अलीकडेच विवाह झाला होता.

घाटगे या मूळच्या कोल्हापूरच्या असल्याने त्यांनी परंपरेप्रमाणे पतींसह अंबाबाईचे दर्शन घेतले.

देवस्थान समितीतर्फे अंबाबाईची प्रतिमा देऊन या नवदाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.