असावं सुंदर कागदाचं रेस्टॉरंट! इथल्या सर्व वस्तू कागदाच्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 09:55 PM2019-01-03T21:55:43+5:302019-01-03T22:04:01+5:30

चीनच्या शानाक्सी प्रांतात एक हटके रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमधील सर्व फर्निचर कागदापासून तयार करण्यात आलं आहे.

या रेस्टॉरंटमधील टेलिफोन, इलेक्ट्रिक फॅन यासारख्या सर्व वस्तू कागदाच्या आहेत.

कागदापासून तयार करण्यात आल्यानं हे फर्निचर पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारं आहे.

रेस्टॉरंटमधील खुर्च्या काडबोर्डपासून तयार करण्यात आल्या असल्या, तरी त्यात 300 पौंड किलो वजनाचा माणूसदेखील अतिशय व्यवस्थितपणे बसू शकतो.

क्वूजिंग बूक सिटीत असणारं हे रेस्टॉरंट सध्या अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतं आहे.

या रेस्टॉरंटचं संपूर्ण डिझाईन तैवानमधील एका टीमनं तयार केलं आहे.

रेस्टॉरंटमधील फर्निचरच्या निर्मितीसाठी जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागला आहे.

रेस्टॉरंटमधील फर्निचरसाठी 3 मिलियन युआनपेक्षा अधिक खर्च आला आहे.