जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? हिंदीचा कितवा क्रमांक लागतो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 02:06 PM2022-12-03T14:06:12+5:302022-12-03T14:55:53+5:30

या मजकुराच्या शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचे तुमच्या मनात पटकन आलेले उत्तर अजिबातच चुकीचे नाही. या जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे इंग्रजी! एका अभ्यासानुसार साधारणतः १ अब्ज ४५ कोटी जनता इंग्रजी बोलते, म्हणजे इंग्रजी ही त्यांची महत्त्वाची व्यवहार भाषा आहे.

त्याखालोखाल दोन क्रमांक मात्र अर्थातच त्या त्या देशांच्या अवाढव्य लोकसंख्येमुळे त्या त्या भाषांच्या वाट्याला आलेले आहेत. १ अब्ज ११ कोटी लोक चिनी, म्हणजे मँडरिन भाषा बोलतात.

तिसऱ्या क्रमांकावर आहे भारतीयांची हिंदी! या जगात सुमारे ६० कोटींपेक्षा जास्त लोक हिंदी बोलतात, असे हा अभ्यास म्हणतो. जाणून घ्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या आणि किती लोकांमध्ये

इंग्रजी - १४५२ दशलक्ष

मँडरिन म्हणजेच चीनी - १११८ दशलक्ष

हिंदी - ६०२ दशलक्ष

स्पॅनिश - ५४८ दशलक्ष

फ्रेंच - २७४ दशलक्ष

अरेबिक - २७३ दशलक्ष

बंगाली - २७२ दशलक्ष

रशियन - २५८ दशलक्ष

पोर्तुगीज - २५७ दशलक्ष

उर्दू - २३१ दशलक्ष