दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना मोदी जॅकेटची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 10:01 PM2018-11-03T22:01:58+5:302018-11-03T22:14:37+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची वेशभूषा आणि त्यांची स्टाइल नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. विरोधकांकडून त्यासाठी त्यांच्यावर टीकाही होते. मात्र आता दक्षिण कोरियाचे राष्ट्रपतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या मोदी जॅकेटचे फॅन बनले आहेत.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांना मोदी जॅकेट एवढी आवडली आहेत की ते कार्यालयामध्ये सुद्धा मोदी जॅकेट परिधान करून जात आहेत.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तसेच मोदी जॅकेट परिधान केलेले काही फोटोसुद्धा त्यांनी ट्विटरवरून शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासाठी हे जॅकेट पाठवले असून, भारतीय वेशभूषेतील आधुनिक पेहराव असलेले हे जॅकेट आता दक्षिण कोरियामध्येही सहज मिळतील, असे मून जे इन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पुढच्या काही दिवसांमध्ये भारतभेटीवर येणार आहेत.

आपल्या भारतभेटीसंदर्भात माहिती देताना मून जे इन यांची सांगितले की, आपण लवकच सपत्निक भारत भेटीवर येणार असून, यावेळी दिवाळी भारतात साजरी करणार आहोत. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.