‘या’ 15 गोष्टींमुळे मानवी जीवन झालं अधिक सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 05:10 PM2018-04-26T17:10:44+5:302018-04-26T17:10:44+5:30

मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज मानवी जीवन सुखकर आणि सुसह्य झालं आहे. पाटा-वरवंट्याची जागा आता मिक्सरने घेतलीये आणि नदी-विहिरींवर कपडे धुण्याऐवजी वॉशिंग मशीन आल्या आहेत. अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यांच्यामुळे आपलं जगणं सोपं झालंय. पाहूया अशा काही वस्तू ज्यांनी आपलं जीवन आणखी सुखकर केलं.

पॅन्टच्या या पट्ट्याला बटण नसल्यानं ते सतत पोटात खुपून त्याचा त्रास होत नाही.

फुलपाखरासारखे कि-बोर्ड ज्याने तुमच्या हाताला आराम मिळतो.

आत किती पैसे ठेवलेत याचा हिशेब ठेवणारा हा स्मार्ट गल्ला.

एकाच रुममधल्या एका व्यक्तीला पुस्तक वाचण्यासाठी तर दुसऱ्याला झोप लागावी म्हणून बनवलेला लॅम्प

हा दुमडणारा चष्मा तुमच्या बॅगमधील जास्त जागा व्यापत नाही.

बाथरुममध्ये गरमीने या आरश्यावर बाष्प जमा होत नाही आणि आपला चेहरा स्पष्ट दिसतो.

हा शॉवर अंग भाजेल इतकं पाणी गरम होऊ देत नाही

हातातील पर्समध्येही राहू शकेल अशी लहान उपयोगी इस्त्री.

हे मेमरी कार्डएवढं पोर्टेबल चार्जर कामात मात्र आहे चोख.

बेड हा फक्त झोपण्यासाठी नसतो हे दाखवणारा हा बेड कम वर्क प्लेस.

ही फोन सांभाळणारी वस्तू आपल्यासारख्या तरूणाईसाठी फार उपयोगाची.

सूर्यप्रकाशामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घेणारे पडदे.

हे लाईट बॉल्स तुम्ही प्रवासादरम्यानही कुठेही घेऊन जाऊ शकता.

हा स्मार्ट बेड तुमच्या शरीरानुसार स्वत:ला अॅडजस्ट करतो आणि सकाळी तुम्हाला झोपेतून उठायलाही मदत करतो

या ट्यूबमधून दोन्ही बाजूंनी टूथपेस्ट निघत असल्याने तुमचे पैसे वाया जात नाहीत.