पोप फ्रान्सीस यांच्या साक्षीने 36 हजार फुटांवर झाला त्यांचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 04:48 PM2018-01-19T16:48:56+5:302018-01-19T16:56:54+5:30

लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हटलं जातं. पण एका जोडप्याची लग्नगाठ मात्र हवेतच 36 हजार फूट उंचीवर बांधली गेली तिही पोप फ्रान्सीस यांच्या साक्षीने.

चिलीच्या विमानवाहतूक कंपनीच्या विमानामध्ये कार्यरत असणाऱ्या पाऊला पोडेस्ट आणि कार्लोस सियुफर्डी यांचा विवाह पोप फ्रान्सीस यांनी विमानातच लावून दिला.

या दोघांच्या विवाहाचे विधी चर्चमध्ये पार पडले नव्हते. त्यामुळे पोप फ्रान्सीस यांनी तात्काळ मी तुमचं लग्न लावून देतो असे सांगितले आणि विमानाचे सर्व कर्मचारी या अनोख्या विवाहसोहळ्याचे साक्षीदार झाले.

पोप यांनी विमानात लग्न लावून दिल्याचं कधीही घडलेलं नाही.' कार्लोस आणि पाऊला यांना दोन मुले आहेत.

2010 साली चिलीमध्ये झालेल्या भूकंपात चर्चचे नुकसान झाल्यामुळे तेथे विवाह सोहळा पार पाडता आला नव्हता.