Volodymyr Zelensky: युक्रेनच्या मुलांना वाचवू शकलो नाही, 45 वर्षांचे आयुष्य फुकट गेले; भावूक होत जेलेन्स्कींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 02:44 PM2022-03-17T14:44:06+5:302022-03-17T14:47:42+5:30

Volodymyr Zelensky : युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे तीस लाख युक्रेनियन नागरिकांनी देश सोडला आहे.

कीव: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेकदा 'तिसरे महायुद्ध' हा शब्द ऐकायला मिळात आहे. 'नाटो' देशांनी या युद्धात सहभाग घेतला, तर तिसरे महायुद्ध नक्की होईल, असे स्वतः जो बायडेन यांनी म्हटले आहे.

तिसरे महायुद्ध झाले तर ते अण्वस्त्रांनी लढले जाईल, असे रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते. आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीच तिसरे महायुद्ध सुरू झाल्याचे म्हटले आहे.

बुधवारी एनबीसी न्यूजशी बोलताना जेलेन्स्की म्हणाले, 'तिसरे महायुद्ध सुरू झाले का? कोणालाच माहीत नाही. पण, या युद्धात युक्रेनचा पराभव झाला तर पुढे कय होईल, हे सांगणे कठीण आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'यापूर्वीही असे घडले आहे. 80 वर्षांपूर्वी सर्वांनीच दुसरे महायुद्ध पाहिले, पण त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाबाबात कोणीही विचार केला नव्हता.'

जेलेन्स्की पुढे म्हणाले की, अध्यक्षपद सोडण्याच्या अटीवर रशियाने युद्धविराम करण्याची अट ठेवली, तरीदेखील मी युक्रेनचे अध्यक्षपद सोडणार नाही.

जेलेन्स्की म्हणाले, 'मी 45 वर्षांचा आहे, आज जेव्हा 100 हून अधिक मुलांच्या हृदयाची धडधड थांबली, तेव्हा मला असे दिसले की आयुष्याची काहीच किंमत नाही माझे 45 वर्षांचे आयुष्य फुकट गेले.

बुधवारी यूएस संसदेला संबोधित करताना त्यांनी बायडेन यांना "जागतिक नेता" बनण्याचे आवाहन केले आणि रशियाला रोखण्यासाठी अधिक निर्बंधांसह लढाऊ विमानांची मागणी केली.

बायडेन यांना उद्देशून जेलेन्स्की म्हणाले, 'तुम्ही महान देशाचे नेते आहात, तुम्ही आता जगाचे नेते व्हावं. जगाचा नेता असणे म्हणजे शांततेचा नेता असणे.

युएस संसदेत जेलेन्स्की यांनी पर्ल हार्बर आणि सप्टेंबर 11, 2001 दहशतवादी हल्ल्याची आठवण करुन दिली. तसेच, रशियाविरुद्ध युक्रेनच्या लढ्यात अधिक मदतीसाठी अमेरिकन संसदेला आवाहनही केले.