घटत्या लोकसंख्येने हैराण झालाय 'हा' देश, आता नागरिकांना मूलं जन्माला घालण्यासाठी लाखो रुपये देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 02:54 PM2022-12-13T14:54:22+5:302022-12-13T14:59:21+5:30

जपान गेल्या काही वर्षापासून घटत्या जन्मदरामुळे हैराण आहे.

जपान गेल्या काही वर्षापासून घटत्या जन्मदरामुळे हैराण आहे. त्यामुळे जन्मदर वाढावा म्हणून देशात वेगवेळ्या योजना राबविल्या जात आहेत. देशाच्या आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाने आता मुलं जन्माला घालणाऱ्यांना पैसे देणार आहे.

जपानमधील एका अहवालानुसार, सध्या, मुलाचा जन्म झाल्यावर पालकांना 4,20,000 येन म्हणजेच 2,53,338 रुपये दिले जाणार आहेत. आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्री कात्सुनोबू काटो यांना हा आकडा 500,000 येन 3,00,402 रुपयांपर्यंत वाढवायचा आहे. या संदर्भात चर्चा सुरू आहे. आर्थिक 2023 साठी लागू होण्याची शक्यता आहे.

'मुल जन्म आणि बालसंगोपन एकरकमी अनुदान' ही योजना सध्या लगू असुनही जपानमध्ये जन्मदर कमी आहे. ही रक्कम जपानच्या सार्वजनिक वैद्यकीय विमा प्रणालीद्वारे दिली जात असली तरीही, मुलाच्या जन्माची' फी' खिशातून भरावी लागते.

ही रक्कम वाढवली तरी, पालक रुग्णालयातून घरी परतल्यावर त्यांच्याकडे सरासरी 30,000 येन शिल्लक राहतील, जे पैसे मुलाचे संगोपन करण्यासाठी मोठी रक्कम नाही.

पालकांना जास्त पैसे मिळाल्याने त्याचा फायदा होणार आहे. तसेच, 80,000 येनची वाढ ही अनुदानासाठी आतापर्यंतची सर्वोच्च आणि 2009 नंतर पहिल्यांदा आहे.

2021 मध्ये जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, एका शतकापेक्षा जास्त कालावधीत सर्वात कमी मुलांचा जन्म जपानमध्ये झाला आहे. या आकडेवारीमुळे खळबळ उडाली आहे कारण लोकसंख्येच्या घटीचे भविष्यात मोठे परिणाम होणार आहेत. बऱ्यात वर्षापासून हा मुद्दा देशाच्या धोरणाचा आणि राजकीय चिंतेचा विषय आहे.

देशात गेल्या वर्षी 8,11,604 जन्म आणि 14,39,809 मृत्यू झाले, परिणामी लोकसंख्या 6,28,205 इतकी कमी झाली. आरोग्य, गतवर्षी जन्मदरात झालेली घट हे बाळंतपणाच्या वयातील महिलांची संख्या तसेच 20 वर्षांच्या महिलांच्या जन्मदरात घट झाल्यामुळे आहे.

टॅग्स :जपानJapan