5 मिनिटांत तणाव पळेल दूर; 'या' उपायांमुळे फायदा होईल भरपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 02:48 PM2019-05-05T14:48:26+5:302019-05-05T14:57:28+5:30

हास्य- हास्य हे अनेक समस्यांवरचं औषध आहे. तणावदेखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे तणावाच्या परिस्थितीतही हसत राहा. समस्येला हसत-हसत सामोरे जा. कारण कोणतीही समस्या कायमस्वरुपी राहत नाही.

दीर्घ श्वास- दीर्घ श्वास घेतल्यानं ताण देणाऱ्या विचारांपासून तुम्ही दूर जाता. या क्रियेनं तुम्हाला शांत होण्यास मदत होते.

च्युईंगम- च्युईंगम चघळल्यानं ताण कमी होतो, असं मेलबर्नमधल्या स्विनबर्न विद्यापीठाचे प्राध्यापक अँड्र्यू स्कोले यांना संशोधनातून आढळून आलं. च्युईंगम चघळल्यानं सौम्य स्वरुपाचा तणाव 16 टक्क्यांनी, तर तीव्र स्वरुपाचा तणाव 12 टक्क्यांनी कमी होतो.

पासवर्ड बदला- मोबाईल किंवा इतर कोणत्याही वस्तूचा पासवर्ड बदलल्यानंदेखील तणाव थोड्याफार प्रमाणात कमी होतो. एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नसेल, त्यावेळी तणाव येतो. त्यावेळी तुम्ही मनासारखा पासवर्ड ठेवू शकता. त्यामुळे काहीतरी आपल्या मनासारखं होत आहे, अशी भावना मनात निर्माण होण्यास मदत होते.

ध्यानधारणा- तणावात असल्यावर शांत राहा आणि डोळे मिटून बसा. तुम्ही कुठेही असलात, तरी यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल.

जवळच्या व्यक्तींना फोन करा- तणाव वाटत असेल, त्यावेळी जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करुन गप्पा मारा. या परिस्थितीत आईशी बोलणं सर्वात चांगलं असतं. आईसोबत बोलल्यानंतर तणाव खूप कमी होतो, असं विस्कोनसिन-मॅडिसन विद्यापीठाच्या अहवालातून समोर आलं आहे.

संगीत ऐका- तणावाच्या परिस्थितीत संगीत ऐकणंदेखील उत्तम पर्याय असतो.

टॅग्स :आरोग्यHealth