हे आहेत पायी चालण्याचे पाच फायदे, तूम्हाला माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 09:42 PM2017-09-10T21:42:28+5:302017-09-10T21:46:05+5:30

तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक जण जिमला जातात खरे पण कामाच्या व्यापामुळे जिमला नियमीत जाणे होत नाही. अश्यावेळी फक्त काही मिनीटे चालल्याने तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता.

जर तुम्ही 30 वर्षाचे असाल तर तुम्हाला माहिती हवे की या वयात हाडं पातळ होतात. अश्यावेळेस जर तुमची हाडं मजबूत नसतील तर वाढत्या वयानुसार हाडांची दुखणी वाढीस लागतात. रोज चालल्याने तुमची हाडं मजबुत होतील.

दररोज चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

अमेरिकन सायकोलॅाजिकल असोसिएशनने केलेल्या एका प्रयोगानरुन असे समोर आले की सकाळच्या वेळी चालल्याने दिवसभर लोकांचा मूड फ्रेश राहतो.

दररोज चालल्याने तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते.

जर तुम्ही हळु हळु चालत असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही, जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर चालण्याचा वेग वाढवणे गरजेचे आहे.