या पदार्थांचा समावेश असावा आहारात, नाहीतर भासेल 'या' व्हिटामिन्सची कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 03:02 PM2018-02-02T15:02:00+5:302018-02-02T15:38:23+5:30

आपल्या आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात पण आपल्याकडून त्या सतत दुर्लक्षित केल्या जातात. इतर गोष्टींची काळजी घेत असताना स्वत:च्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करत असतो. आपण सकस आणि समतोल आहाराचे सेवन केले तरी आपली निम्मी दुखणी कमी होऊ शकतात. आपण आपल्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश वाढवावा, जेणेकरून ‘हे’ काही आवश्यक व्हिटामिन्स आपल्या शरीरात राहतील.

१) व्हिटामिन ए - व्हिटामिन ए हे शरीरासाठी अत्यावश्यक असतं आणि ते एक उत्तम अँटीऑक्सि़डंट असतं. उत्तम दृष्टी राखण्यासाठी, चांगल्या त्वचेसाठी हे व्हिटामिन फार महत्त्वाचं असतं. शरीरात होणारी जळजळ या व्हिटामिनमुळे कमी होते. तसंच अचानक होणाऱ्या वयवाढीच्या चिन्हांनाही दुर ठेवते. गाजर, आंबे, मासे आणि भोपळा मिरची इत्यादींमध्ये ए व्हिटामिन आढळून येतं.

२) व्हिटामिन बी २ - व्हिटामिन बी २ हे एक उत्तम अँटीऑक्सिडंटचं काम करतं. शरीरातील पेशींना हानी पोहचवणाऱ्या तंतूंना दूर ठेवतं. अवेळी दिसणारी वय वाढीची चिन्हं आणि ह्रदयरोगापासून आपल्याला दूर ठेवतं. लाल रक्त पेशींच्या वाढीत याची चांगली मदत होते आणि तसंच यामुळे शरीरभर रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राहतो. चीझ, अंडी, हिरव्या पालेभाज्या आणि मास्यांमध्ये हा व्हिटामिन सापडून येतो.

३) व्हिटामिन बी ६ - व्हिटामिन बी, बी ९ आणि बी १२प्रमाणेच बी ६सुध्दा शरीरातील अमिनो अॅसिडची निर्मिती नियमित ठेवतो. आपला मुड आणि झोपेवर नियंत्रण ठेवण्यात पायराडॉक्साईन फार महत्त्वाची भूमिका बजावतं. तसंच संधीवातासारख्या त्रासाला दूर ठेवण्यासाठीसुध्दा या व्हिटामिनची मदत होते, असं काही अभ्यासात सिध्द झालं आहे. हे व्हिटामिन शरीरात मुबलक प्रमाणात राहावं म्हणून आपल्या आहारात मासे, अंडी, केळी आणि तृणधान्यांचा भरपूर समावेश ठेवावा.

४) व्हिटामिन बी - १२ व्हिटामिन बी ९ च्या मदतीने हे व्हिटामिन बी १२सुध्दा लाल रक्तपेशींची वाढ होण्यास महत्त्वाचं काम करतं. तसंच रक्तातील लोहाला ऑक्सिजनकडून प्रोटीन घेणे आणि हिमोग्लोबिन घेण्याचं काम करण्यास प्रवृत्त करतं. हे व्हिटामिन जास्त करुन शाकाहारी लोकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात दिसून येतं. अंड, चीझ, सुका मेवा आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये हे व्हिटामिन बी १२ जास्त दिसून येतं.

५) व्हिटामिन बी ७ - या व्हिटामिनचा थेट संबंध केस, त्वचा आणि नखांशी येत असल्याने त्याला ‘ब्युटी व्हिटामिन’ असंही म्हणतात. रक्तातील साखरेचं प्रमाण नियमित ठेऊन मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी या व्हिटामिन बी ७ची मदत होते. गरोदर स्त्रीच्या शरीरात या व्हिटामिनचं प्रमाण जास्त असणं गरजेचं असतं. कारण बाळाच्या नैसर्गिक वाढीत ते महत्त्वाचं असतं. रासबेरी, बदाम, अक्रोड आणि केळ्यांत याचं प्रमाण मुबलक असतं.