अशाप्रकारे तयार करा तुमचा फिटनेस प्लॅन, आज-उद्याचा कंटाळा सोडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 11:38 AM2018-09-25T11:38:04+5:302018-09-25T11:45:37+5:30

फिटनेसबाबत अलिकडे फार जागरुकता बघायला मिळते. पण काही लोक हे प्लॅन करुनही काहीच करत नाहीत. आज, उद्या असं करत करत ते कोणताही फिटनेस प्लॅन फॉलो करत नाहीत. काही लोक तर भरपूर खातातही आणि जिमलाही जातात. पण त्यांचं वजन काही केल्या कमी होत नाही. अशावेळी काय करायला हवे याच्या काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी पेन आणि कागदे घेऊन बसण्याची गरज नाहीये. फक्त काही गोष्टी आपल्या डोक्यात फिट करुन घ्या आणि त्या फॉलो करा. (Image Credit : landerapp.com)

फिटनेसचा पहिला नियम म्हणजे तुम्हाला जी एक्सरसाईज अधिक आवडते ती करा. जर तुम्हाला रनिंग करण्यात जास्त इंटरेस्ट असेल तर तेच करण्यावर फोकस करा. तुम्हाल पुश अप्स पसंत असतील तर ते करा. आता हे नका म्हणू की, मला झोपायला जास्त आवडतं. (Image Credit : www.muscleandfitness.com)

जी एक्सरसाइज तुम्हाला जास्त पसंत आहे ती ४० दिवस सतत करा. आठवड्यातून एक दिवस आराम केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीरात काही बदल दिसतील. तुम्हाला याचा अंदाज आलेला असेल की, तुम्ही कोणत्या प्रकारच्या एक्सरसाइजमध्ये फिट आहात आणि न थकता जास्तवेळ काय करु शकता. (Image Credit : www.worldmeeting2015.org)

सतत ३० ते ४० दिवस आपल्या शरीराला ४५ मिनिटे ते ९० मिनिटे दिल्याने तुमचं शरीर एक्सरसाइजबाबत डेडिकेट होईल. तुमचा मेंदुही फोकस करणे सुरु करेल. तुम्हाला एक व्यवस्थित लाइन मिळेल. (Image Credit : www.snapfitness.com)

यानंतर वेळ आहे ती एक्सरसाइजमध्ये बदल करण्याची. तुमच्या पसंतीची एक्सरसाइज करुन आता तुम्हाला एक्सरसाइजची सवय झाली असेल. त्यामुळे तुम्ही वेगळ्या एक्सरसाइज करुन फायदा मिळवू शकता. जसे की, कधी डंबेल्स तर कधी कार्डियो करा. याला तुमचं शरीर सकारात्मक प्रतिसाद देईल. (Image Credit : stylecaster.com)

आताच्या लाइफस्टाइलमध्ये ऑफिसपासून ते घर सगळ्याच गोष्टींचे टारगेट सेट करावे लागतात. फिटनेससाठीही तेच करावे लागते. तुम्हाला तुमच्या शरीराकडून काय हवंय हे सेट करा. शरीराच्या सीमा जाणून घेतल्या आता शरीराची मजबूती कायम ठेवण्यासाठी काही गोष्टी टारगेटवर ठेवा. (Image Credit : www.princepalace.co.th)