वजन कमी करण्यासाठी पुर्ण शाकाहारी डाएट प्लॅनमधल्या ६ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 04:17 PM2017-12-19T16:17:03+5:302017-12-19T16:53:38+5:30

जगभरातील अनेक अभ्यासांच्या निष्कर्षात असे सिध्द झाले आहे की शाकाहारी व्यक्तींपेक्षा मांसाहारी व्यक्तींमध्ये जास्त आजार दिसून येतात. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि ह्रदयरोग अशा अनेक आजारांचं प्रमाण शाकाहारींपेक्षा मांसाहारींमध्ये जास्त दिसून येतं.

शरीराचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर सर्वप्रथम पुर्ण शाकाहार सुरु करावा. नाश्त्यालापण ओट्स, केळी, दुध आणि मध हे एकत्र सुरु करून खात जावं. सोबत दूध घेता येईल मात्र अंड्याचं सेवन टाळावं.

नाश्त्यामध्ये, जेवणात आणि दिवसभरात लागणाऱ्या लहान भूकेसाठी भिजवलेले मुग किंवा मुगाचं सलाड खाणं सुरु करावं. सोबत फळंसुध्दा ठेवावीत. जेणेकरुन अवेळी भुक लागली तर फास्ट फुड खावं लागणार नाही.

पुर्ण शाकाहारी म्हणजेच वेगन डाएटवर असणाऱ्यांनी दुध, दुधाचे पदार्थ आणि अंड टाळावं. त्यासाठी पनीरऐवजी जेवणात टोफु किंवा सोयाबीन असलेलं चांगलं. भाज्या किंवा वटाणे टाकून हेल्दी पास्ताही बनवता येईल.

रोज रोजच्या शाकाहारी खाण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून वेगवेगळ्या भाज्या आणि कडधान्यांचा वापर जेवणात असावा. एक दिवस कडधान्य खाल्यास दुसऱ्या दिवशी पालेभाजी खावी. तिसऱ्या दिवशी फळभाज्या खाव्यात. भाज्यांचा क्रम बदलता ठेवल्यास डाएट कंटाळवाणा होत नाही.

या शाकाहारी आहारादरम्यान खुप फळं खात राहणं चांगलं असतं. भरपुर फळं आणि भरपुर फळांचा रस शरीरात जाणं आरोग्यदायी असते. कांदा आणि लसूण सोडलं तर सर्व भाज्या सालेसहीत खाल्या तरी चालतात.