वजन घटवण्याची आहे घाई?, सकाळी नाश्त्यामध्ये खा हे 5 पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 03:05 PM2018-07-24T15:05:55+5:302018-07-24T15:14:02+5:30

ओट्स इडली : इडली पौष्टिक असा पदार्थ आहे. सकाळी-सकाळी कार्यालय गाठण्याची घाई असेल आणि नाश्ता बनवण्यासाठी वेळ मिळत नसल्यास खूप कमी वेळेत ओट्स इडली बनवता येते. ओट्ससोबत काही भाज्यांचादेखील समावेश करू शकता. ओट्स इडली दहीसोबत खाऊ शकतो. यामुळे पचनक्रिया सुधारते शिवाय वजनदेखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ओम्लेट पराठा : अंड हे प्रथिनांचं उत्तम स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे नाश्तामध्ये अंड्याचा समावेश जरुर करावा. उकडलेले अंड खाऊन कंटाळा आला असेल तर ओम्लेट पराठा नाश्तामध्ये खाऊ शकता. मात्र, पराठा करताना तेलाचा जास्त वापर करू नये.

लापशीमुळेही शरीरास भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात. दुधाच्या मदतीनं लापशी बनवणार असाल तर साखरऐवजी मधाचा वापर करावा.

सोया उत्तपा : नाश्त्यामध्ये सोया उत्तपा खाल्यास दिवसभरासाठी भरपूर ऊर्जा मिळते. शिवाय, वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. या उत्तपामध्ये हिरव्या भाज्यांचाही समावेश करता येऊ शकतो.

बेसनचा डोसा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. दुपारच्या जेवणातही बेसन डोसा खाऊ शकता. पण हा डोसा बनवताना तेलाचा जास्त वापर करू नये.