सध्या ट्रेन्डमध्ये आहे पेपलम कुर्ती; डेली डेनिमसोबत असं करा वेअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:04 PM2018-09-25T16:04:23+5:302018-09-25T16:08:06+5:30

दररोज नवनवीन ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये येत असतात. सध्या असाच एक फॅशन ट्रेन्ड सगळीकडे पहायला मिळतोय तो म्हणजे, पेपलम टॉप आणि कुर्तीचा. परंतु या स्टाइलमध्ये मुली फारशा एक्सपरिमेंट करत नाहीत. खरं तर पेपलम अनेक प्रकारे ट्राय करता येते. जाणून घेऊयात वेगवेगळ्या पेपलम टॉप आणि कुर्ती ट्राय करण्याच्या पद्धतींबाबत...

पांढऱ्या रंगाच्या हा फुल स्लीव्स असलेला पेपलम कुर्त्याची नेक डिझाइन बँड नेक आहे आणि फिटिंग ए-लाइन आहे. तुम्हाला कूल आणि कॅज्युअल लूक पाहिजे असेल तर तुम्ही व्हाइट पेपलम कुर्ता वॉश्ड ब्लू किंवा ब्लॅक जींनससोबत ट्राय करू शकता.

पावडर ब्ल्यू कलरचा बटन असलेल्या प्रिंटेड पेपलम कुर्त्याची नेक डिझाइन स्प्रेड कॉलर आहे. तुम्हाला हे पेपलम टॉपसारखंही वपरता येऊ शकतं. एखाद्या दिवशी जर तुम्हाला काही वेगळं परिधान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा टॉप कवर वॉश्ड जीन्स किंवा डेनिम पॅन्टसोबत वापरू शकता.

पेपलम कुर्तीमुळे तुम्हाला एक क्लासी लूक मिळतो. डीप पिंक कलरची सुंदर स्लीवलेस पेपलम कुर्ती तुम्ही डार्क ब्ल्यू कलरच्या जीन्सवर घालू शकता.

मरून कलरचा पेपलम टॉप किंवा पेपलम स्टाइल कुर्ता पार्टी वेअर म्हणूनही वापरू शकता. तुम्ही जीन्ससोबत हा टॉप वेअर करू शकता. पण जर तुम्ही पार्टीसाठी तयार होत असाल तर स्कर्टसोबत याचा लूक आणखी खुलून दिसतो.

ब्ल्यू कलरच्या पेपलम कुर्तीवर गोल्डन रंगाची एम्ब्रॉडरी फार सुंदर दिसते. तुम्ही हा कुर्ता जीन्सवर वेअर करू शकता.