कतरिनाच्या 10 डिफरन्ट स्टाईल, तुम्हीही फॉलो करु शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 06:44 PM2019-05-31T18:44:23+5:302019-05-31T18:51:38+5:30

दबंग खान म्हणजेच सलमान खानचा आगामी चित्रपट भारत लवकरच रिलीज होणार आहे. ज्यामध्ये सलमानसोबत कतरिना कैफ स्क्रिन शेअर करणार आहे. कतरिना आपल्या आगामी चित्रपटाबाबत फारच उत्सुक आहे. या निमित्ताने कतरिना अनेक इव्हेंटमध्ये दिसत आहे. प्रमोशन दरम्यान कतरिना एकापेक्षा एक हटके आउटफिट्समध्ये दिसून येत आहे. पण या सर्व लूक्समध्ये कतरिनाचा साडी लूकला सर्वांनी पसंती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच करतिनाचे दोन साडी लूक व्हायरल झाले होते, त्यांना अनेक फॅन्सनी पसंती दिली.

कतरिना डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांच्या बेबी पिंक फ्लोरल बेल्ट स्टाइल साडीमध्ये दिसून आली होती. ज्यासोबत तिने फुल स्लीव्स ब्लाउज कॅरी केला होता.

काही दिवसांपूर्वी कतरिना ऑरेंज अॅन्ड ब्लॅक फ्लोरल साडी लूकमध्ये दिसून आली होती. ज्यासोबत तिने ब्लॅक ब्लाउज कॅरी केला होता. जर तुम्हीही साडी वेअर करण्याचे शौकीन असाल, तर कतरिनाप्रमाणेच साडी ड्रेप करून मॉर्डन दिसू शकता.

फ्लोरल प्रिंटेड साडीमध्ये डीसेंट दिसतेय कतरिना

शरारा स्टाइल साडीमध्ये हटके दिसतेय कतरिना

कतरिनाचा प्रिंटेड साडीमधील लूक

शियर साडीमध्ये कतरिना

केप स्टाइल साडीमध्ये क्लासी दिसतेय कतरिना

कतरिना कैफ रफ्फल साडीमध्ये

गाउन स्टाइल साडीमध्ये कतरिना

नेट फॅब्रिक साडीमध्ये सुंदर दिसतेय कतरिना