बापरे! 3 किलो सोन्याच्या विटा, 6 सोन्याच्या बांगड्या... पहा अर्पिता मुखर्जीच्या खजिन्यात आतापर्यंत काय सापडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:10 PM2022-07-28T18:10:54+5:302022-07-28T18:58:17+5:30

Arpita Mukharjee : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्पिता मुखर्जीच्या अपार्टमेंटमधून 27.90 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. मुखर्जी ही अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय मानली जात आहे.

बेलघरिया येथील एका अपार्टमेंटमधून रोख रक्कम जप्त करण्यात आली आणि रात्रभर मोजणी केल्यानंतर जप्त केलेली रोकड 10 लोखंडी पेठाऱ्यांमध्ये पाठवण्यात आली. (All Photos - NBT)

50 कोटींहून अधिक रोकड सापडली : आतापर्यंत एकूण 50 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या ठिकाणांवर छापे टाकले : दक्षिण कोलकातामधील राजडांगा आणि उत्तर कोलकातामधील बेलघरिया येथे विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.

फ्लॅटचे कुलूप तोडून पथक आत गेले : ईडीच्या अधिकाऱ्यांना बेलघरियाच्या रथतला भागातील दोन्ही फ्लॅटच्या चाव्या न मिळाल्याने दरवाजा तोडून आत जावे लागले.

बेडरूमच्या कपाटात रोख रक्कम व सोने होते, अर्पिता मुखर्जी यांच्या बेडरूममधील कपाट रोख रक्कम आणि सोन्याने भरले होते. 50 कोटींहून अधिक रोकड सापडली

तीन किलो सोन्याच्या सळ्या : अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटी रुपयांचे भारतीय चलन आणि तीन किलो सोन्याच्या सळ्या जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून २७ कोटी ९० लाख रोख आणि ४.३१ कोटींचे दागिने जप्त