माहीने घेतली ही ढासू बाईक; BMW च्या इंजिनामुळे रेसिंग बनणार रोमांचकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 08:24 AM2019-05-28T08:24:22+5:302019-05-28T08:32:06+5:30

भारताचा आजपर्यंतचा सर्वांत यशस्वी कर्णधार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने भारतीय कंपनीची ही वेगवान रेसिंग बाईक त्याच्या ताफ्यात सामिल केली आहे. विशेष म्हणजे या बाईकला बीएमडब्ल्यूचे इंजिन देण्यात आले आहे.

टीव्हीएस ही भारतीय कंपनी आहे, आणि माही या कंपनीचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. TVS ने Apache RR 310 या रेसिंग बाईकचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. या बाईकला खास रेसिंगसाठी बनविण्यात आले आहे. या बाईकच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

महत्वाचा बदल म्हणजे या बाईकमध्ये स्लिपर क्लच चेन स्लीप देण्यात आला आहे. जुन्या अपाचीचे ग्राहकही हा क्लच बसवून घेवू शकतात.

कंपनीने सांगितले की स्लिपर क्लचवाल्या बाईकचा पहिला ग्राहक महेंद्र सिंह धोनी आहे. त्याच्याच हस्ते या बाईकचे लाँचिंग करण्यात आहे.

Apache RR 310 चे इंजिन 9,700 आरपीएमवर 34 bhp ताकद आणि 7,700 आरपीएमवर 27.3 Nm चा पीक टॉर्क देते.

या बाईकची किंमत 2.27 लाखांपासून सुरु होते.