जबरदस्त! TATAने लॉन्च केले Kaziranga Edition, गेंड्याच्या सन्मानार्थ घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 08:48 PM2022-02-23T20:48:43+5:302022-02-23T20:52:11+5:30

TATA Motors ने काझीरंगातील एक शिंग असलेल्या गेंड्याच्या सन्मानार्थ आपल्या TATA Punch, Nexon, Safari आणि Harrier या SUVचे स्पेशल एडीशन काढले आहे.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील एक शिंगे असलेल्या गेंड्याच्या सन्मानार्थ टाटा मोटर्सने(TATA Motors) आपल्या संपूर्ण SUV श्रेणीची काझीरंगा आवृत्ती(Kaziranga Edition) भारतात लॉन्च केली आहे. TATA ने Punch, Nexon, Safari आणि Harrier ची टॉप मॉडेल्स स्पेशल एडिशन्समध्ये सादर केली आहेत.

काझीरंगा एडिशनमध्ये या सर्व एसयूव्हींना ड्युअल-टोन बेज-ब्लॅक एक्सटीरियर कलर स्कीम, बेज अपहोल्स्ट्री, वुड डॅशबोर्ड आणि व्हिज्युअल अपडेट्स देण्यात आले आहेत.

सर्व SUV च्या पुढील फेंडरवर गेंड्याचे चिन्ह देखील दिले गेले आहे. Tata Punch ला कनेक्टेड कार तंत्रज्ञान, Nexon ला वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, वायरलेस फोन चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, एअर प्युरिफायर आणि ऑटो-डिमिंग IRVM मिळतात.

Tata Motors ने पंच काझीरंगा एडिशनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.58 लाख रुपये ठेवली आहे, जी 9.48 लाख रुपयांपर्यंत जाते. नेक्सॉन काझीरंगाची किंमत 11.78 लाख ते 12.43 लाख रुपये आहे, तर नेक्सॉन डिझेलच्या काझीरंगा एडीशनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.08 लाख रुपये आहे.

टाटा हॅरियर काझीरंगा एडिशनच्या एक्स-शोरूम किमती रु. 20.40 लाख ते रु. 21.70 लाखांपर्यंत आहेत. तर, सफारी काझीरंगा एडीशनची किंमत 20.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 22.39 लाख रुपयांपर्यंत जाते.

Tata Harrier Kaziranga Edition ला वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, वायरलेस फोन चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि एअर प्युरिफायर मिळतात.

टाटा मोटर्सच्या काझीरंगा एडिशनमधील चौथी SUV सफारी आहे, ज्यामध्ये कंपनीने कोणतेही वेगळे फीचर दिलेले नाही. हे सर्व फीचर्स एसयूव्हीच्या गोल्ड एडिशनमध्ये आधीच देण्यात आले आहेत.

स्पेशल एडिशनमधील सर्व एसयूव्ही ग्रासलँड बेज शेडमध्ये आहेत, जी सवाना ग्रास काझीरंगा परिसरात आढळले आहेत. यासोबतच कॉन्ट्रास्ट ब्लॅक अलॉय व्हील, बॅज आणि क्रोम दिले आहेत.

काझीरंगा एडिशन एसयूव्हीला केबिनमध्ये पूर्णपणे काळ्या रंगाचा डॅशबोर्ड मिळतो आणि त्याचे कॉन्ट्रास्ट बेज टच सीट्स आणि डोर पॅड्सवर देण्यात आले आहेत. SUV च्या पुढील सीट हेडरेस्टमध्ये एक शिंग असलेला गेंडा आहे.

सर्व स्पेशल एडिशन SUV मध्ये कोणतेही तांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत. Tata Harrier आणि Safari 2.0-लीटर डिझेल इंजिनसह येते, जी 170PS पॉवर बनवते, तर पंचमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जी 86PS पॉवर जनरेट करते. Tata Nexon मध्ये 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन पर्याय आहेत.