शहरं
Join us  
Trending Stories
1
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
2
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
3
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
4
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
5
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
6
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
7
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
8
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
9
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
10
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
12
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
13
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
14
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
15
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
16
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
17
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
18
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
19
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
20
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी लगीनघाई

By admin | Updated: December 29, 2016 00:21 IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी लगनीघाई सुरू केली आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी लगनीघाई सुरू केली आहे. मात्र अंतर्गत दुहीमुळे काही पक्षांसमोर संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करून सत्तेचा सोपान चढण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर सत्ता प्राप्तीसाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले. जिल्हा परिषदेतूनच राज्याला अनेक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषदेवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली. मात्र काही पक्षांतील दुही यात अडथळा ठरत आहे. अपवाद वगळता आजपर्यंत येथील जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. तथापि गेल्यावेळी राष्ट्रवादीने ऐनवेळी काँग्रेसला झटका दिल्याने अडीच वर्षे शिवसेनेला सत्तेची चव चाखता आली होती.
फेब्रुवारीत होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी नव्या दमाने मोर्चेबांधणी चालविली आहे. काँग्रेसने जनआक्रोश यात्रेच्या माध्यमातून थेट जनतेत मिसळून केंद्र व राज्य शासन कुचकामी असल्याचे मतदारांच्या लक्षात आणून देण्याचा खटाटोप चालविला. मात्र नवीन जिल्हाध्यक्षांची निवड आधी करावी, या मागणीने आता ही यात्राच वांद्यात सापडली आहे. भाजपाने त्यांच्या ताब्यातील विधानसभा मतदार संघात विकास कामांच्या भूमिपूजनांचा सपाटा सुरू केला. लहान-सहान कामांचेही दिमाखदार भूमिपूजन सुरू झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री व राज्य शासनात ऊर्जा, उद्योग आदी विभागांचे राज्यमंत्री पद असल्याने हा पक्ष ताकदवान झाला. त्याचा लाभ घेत भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. इतर पक्षांतील काठावरील इच्छुकांना जाळ्यात ओढण्याचे सत्र भाजपाने सुरू केले आहे.
शिवसेनेनेही तालुकास्तरावर इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सुरू केले. पालकमंत्री पद असल्याने शिवसेनाही यावेळी मोठ्या जोमाने निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक घेऊन निवडणुकीचा बिगुल फुंकला खरा, मात्र या पक्षात खदखद सुरू आहे. काही माजी पदाधिकारी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहे. सर्वच पक्षांसमोर कमी अधिक प्रमाणात पक्षांतर्गत वादाची समस्या आहे. त्यातून मार्ग काढून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर वर्चस्व प्राप्त करण्यात त्यांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत.(शहर प्रतिनिधी)

एमआयएम निवडणूक लढणार
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांशिवाय मनसे, बसपा, आरपीआयसुद्धा या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी एमआयएम पक्षाला भरीव यश मिळाले. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये एमआयएमचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक रंगतदार होईल.