कोरोना संकटात मदतीला धावून आले ‘वायपीएस’चे कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:35+5:30

जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) आणि यवतमाळ प्री-प्रायमरी स्कूलमध्ये काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी आपला एप्रिल महिन्यातील एक दिवसाचा पगार मदत निधी म्हणून दिला आहे. यातून जमा झालेली ४८ हजार ८० रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सुपूर्द करण्यात आली.

YPS personnel rushed to the rescue of Corona | कोरोना संकटात मदतीला धावून आले ‘वायपीएस’चे कर्मचारी

कोरोना संकटात मदतीला धावून आले ‘वायपीएस’चे कर्मचारी

ठळक मुद्देदोन लाखांचा निधी : गरजूंसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने यवतमाळ शहरावर अभूतपूर्व संकट कोसळले आहे. या संकटात यवतमाळ पब्लिक स्कूल आणि यवतमाळ प्री-प्रायमरी स्कूलचे कर्मचारी मदतीला धावून आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार तर संस्थेने दीड लाख रुपये असा दोन लाखांचा मदत निधी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला.
जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) आणि यवतमाळ प्री-प्रायमरी स्कूलमध्ये काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपला एप्रिल महिन्यातील एक दिवसाचा पगार मदत निधी म्हणून दिला आहे. यातून जमा झालेली ४८ हजार ८० रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सुपूर्द करण्यात आली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत यवतमाळ जिल्हा आणि शहरातील गरजूंसाठी हा निधी उपयोगी ठरेल असे यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खात्यात हा निधी जमा करण्यात आला. यावेळी यवतमाळ पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. जेकब दास, यवतमाळ प्री-प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या निहारिका प्रभुणे, यवतमाळ पब्लिक स्कूलचे अधीक्षक विवेक भोयर व लेखा परीक्षक संदीप पांडे उपस्थित होते.
यापूर्वीही यवतमाळ पब्लिक स्कूलमार्फत याच कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दीड लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संकट काळात मदतीला धावून आल्याबद्दल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संस्थेला जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत प्रशस्तीपत्रही बहाल केले.

Web Title: YPS personnel rushed to the rescue of Corona