शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

गटाच्या कर्जाला कंटाळून युवकाची आत्महत्या

By admin | Updated: November 19, 2016 01:33 IST

गटाच्या माध्यमातून कर्जाच्या खाईत ग्रामीण मजूर मोठ्या प्रमाणात फसला जात आहे.

मारेगाव तालुक्यातील तिसरी घटना : ग्रामीण मजूर गट कर्जाच्या विळख्यातमारेगाव : गटाच्या माध्यमातून कर्जाच्या खाईत ग्रामीण मजूर मोठ्या प्रमाणात फसला जात आहे. आता या कर्जाने तालुक्यात उग्ररूप धारण केले असून तालुक्यातील चिंचमंडळ येथील युवकाने कर्जाचा हप्ता भरता येत नाही, या भितीने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. गणेश महादेव ठमके (३०) असे मृत युवकाचे नाव आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. कसलीही आर्थिक पत नसताना आणि कोणतीही कागदपत्रे कर्ज घेण्यासाठी लागत नसल्याने अनेक मजुरांनी कर्ज फेडायची ऐपत नसतानाही एकाचवेळी अनेक गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. अनेक धनाढ्यांनी आपला काळा पैसा या व्यवसायात लावला आहे. बँकेमार्फत या कर्जाचा व्यवहार होत नसल्याने सरकार दप्तरी याची कुठेही नोंद होत नाही. गरजू लोकांना कर्ज मंजुर करून काही पैसे नगदी, तर काही पैशाच्या तकलादू वस्तू कर्जदारांच्या माथी मारल्या जातात. यावर चक्रवाढ व्याज आकारून दर आठवड्याला कर्ज हप्त्याची वसुली केली जाते. चिंचमंडळ येथील गणेश ठमके या तरूणानेही कुटुंबाची निकड म्हणून तीन विविध गटाकडून ९० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. परंतु दर आठवड्याला तिनही गटाचे कर्ज हप्ते परत करता येत नसल्याने कुटुंबियांची पैशाअभावी तारांबळ उडत होती. दिवाळी सणात मजुरी न करता आल्याने आणि दिवाळीत जवळचे पैसेही संपल्याने गणेश ठमके याचे गटाच्या कर्जाचे हप्ते थकले होते. १८ नोव्हेंबर रोजी गटाचे कर्जदार घरी येणार या भितीने गणेशच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वीच घर सोडून माहेर गाठले होते. अशातच गुरूवारी गटाच्या वसुलीसाठी कर्मचारी गावात येऊन गणेशला धमकावून गेले. त्यामुळे भितीने घाबरलेल्या गणेशने गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या केली. यापूर्वीही तालुक्यातील घोडदरा, बोरी गदाजी येथील कर्जदारांनी आत्महत्या केली होती. गटाच्या कर्जात खेड्यातील मजुरदार वर्ग मोठ्या प्रमाणात गुरफटला आहे. (शहर प्रतिनिधी)